कोपरगांव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगांव शहर व विधानसभा मतदार संघातील विविध गांवचे सरपंच, उपसरपंच आणि सहकारी सोसायटयांचे अध्यक्ष व नागरिकांच्या प्रलंबित समस्यांच्या निवारणार्थ तहसिलदार बोरूडेंच्या दालनात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष व युवानेते, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी १२ सप्टेंबर रोजी बैठक घेतली. याप्रसंगी गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
विवेक कोल्हे म्हणाले की, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगांव शहरासह विधानसभा मतदार संघातील रहिवासीयांना भेडसावणा-या मुलभूत समस्यांचे निवारण व्हावे, प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र अपात्र ड यादीतील घरकुल लाभार्थ्यांना तसेच शासकीय स्तरावरील विविध योजनांचा लाभ तळागाळातील उपेक्षीतांना मिळावा, त्याचप्रमाणे नव्यांने व दुबार शिधापत्रिका मिळाव्यात आदि प्रलंबित समस्यां संदर्भात २ मे रोजी जनआक्रोश मोर्चा घेवुन त्याबाबतचे निवेदने देण्यांत आली होती त्यावर झालेल्या कार्यवाहीचा आढावा यावेळी घेण्यांत आला.
सध्या जनावरांमध्ये लम्पी विषाणुजन्य आजाराची साथ पसरली आहे. शेतीला पुरक उद्योग म्हणुन कोपरगांव तालुक्यातील बहुतांष शेतक-यांकडे मोठया प्रमाणात पशुधन असुन त्यांना लम्पीचे लसीकरण पुर्ण क्षमतेने होण्यांबाबत तालुका पशुसंवर्धन अधिका-यांना सुचना करण्यांत आल्या. त्याचप्रमाणे नेमुन दिलेल्या गावांना ग्रामसेवक व तलाठी उपस्थित रहात नाही परिणामी नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले उतारे तसेच विविध शासकीय योजनांसाठीची कागदपत्रे मिळण्यांत अडचणी निर्माण होतात त्याबाबत असंख्य तक्रारी आहेत त्यावर तहसिलदार विजय बोरुडे यांनी संबंधीतांना सुचना केल्या.
या बैठकीत आपेगांव पिण्यांच्या पाणी योजनेसाठी जमिन, कोकमठाण सडे शिंगवे रस्त्याच्या कामासाठी चार महिन्यांपासुन खडी येवुन पडली असुन त्याचे काम मार्गी लागावे, धोत्रे तळेगांव, घोयेगांव रस्त्याच्या वेडया बाभळीं काढाव्या, उक्कडगांव ग्रामपंचायत चौदावा व पंधराव्या वित्त आयोगातील विकास कामे मार्गी लागावी, उक्कडगांव जलजीवन मिशन अंतर्गत पाईप लाईनची वर्क ऑर्डर, १४० खातेदारांचे निधीचे प्रस्ताव, धोत्रे तळेगांव शिवरस्ता अतिक्रमण,
पाचवस्ती व शेती रस्याचे काम, कालींदीनगर ड्रेनेज काम, वीज व शेती पाटपाणी संदर्भात उदभवणा-या अडचणी, कोविड मयतांच्या वारसांना शासन वैद्यकीय मदत, काकडी गांव अंतर्गत व काकडी विमानतळ प्राधिकरणांची थकीत पटटी तर बहादरपुर चोंडी वस्ती रस्त्याचे अतिक्रमण काढुन प्रलंबित विकास कामे मार्गी लागावी म्हणून युवानेते विवेक कोल्हे यांनी चर्चा केली ही सर्व कामे तात्काळ मार्गीलावण्याचे आश्वासन तहसिलदार विजय बोरूडे यांनी दिले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, माहेगांव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, कैलास रावण राहणे, रीपाई राज्य सचिव दिपकराव गायकवाड, पढेगांवचे सरपंच प्रकाश किसन भाकरे, अशोकराव गवारे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, सतिष केकाण, कुंभारीचे सुनिल ज्ञानदेव कदम, ज्ञानदेव गजानन कदम, किसनराव गव्हाळे, पुंजाराम शिंदे, बबनराव साळुंके, अशोक गव्हाणे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.