आ. सुधीर तांबे यांनी मतदार नोंदणीचा घेतला आढावा

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदार नोंदणीचा आढावा घेतला.

Mypage

 यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या पदवीधर मतदार नोंदणीचे फॉर्म त्यांच्या कार्यालयाकडे जमा करण्यात आले. तसेच आगामी काळात तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. फडके, शहराध्यक्ष किशोर कापरे, युवक अध्यक्ष बब्रु वडघने यांनी दिली.

Mypage

      यावेळी युवक शहराध्यक्ष गणेश क्षिरसागर, उपाध्यक्ष सचिन काळे, अमोल दहिफळे, आदेश फडके, निजामभाई पटेल, दशरथ धावणे, राजू शेळके, रावसाहेब लहासे, नामदेव कारंडे, किसान सेलचे अध्यक्ष शहादेव देवढे, राजेंद्र गिरगे, रज्जाक पठाण, शेळके सर, स्वप्निल सुपारे, निलेश नारद, अमजद पठाण, जाकीर भाई पठाण, स्वप्निल सुसे, अरुण गायकवाड, बग्गा डाके, सागर भांगे,  सुरेश निकाळजे, बाजीराव अंगरक आदी उपस्थित होते. 

Mypage