श्री रेणुका माता मल्टीस्टेटच्या उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

तब्बल ५१ लाख रुपयांची रोख पारितोषिके

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : देशातील नऊ राज्यात १२७ शाखामधून ७० हजार कोटीची उलाढाल करणाऱ्या श्री रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेतील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व शाखांचा वार्षिक गुणगौरव सोहळा नुकताच  नगर येथील माऊली सभागृहात प्रथितयश सिने अभिनेते अंकुश चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना तब्बल ५१ लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली.

  श्री रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत नाना भालेराव यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याचा पायंडा पडला. तो अत्याहतपणे चालू आहें. श्री रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेच्या सर्व शाखातील १३०० सेवकांपैकी निवड झालेल्यांना कमीत कमी पाच हजारापासून एक लाख २१ हजारापर्यंत वैयक्तिक तर प्रथम आलेल्या पाथर्डी शाखेस एक लाख ५१ हजार रकमेचे रोख, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

तसेच बहुतेकांना पदोन्नतीची पारितोषिके  बहाल करण्यात आली. त्यातून त्यांना वार्षिक वेतनवाढीच्या रूपाने दरमहा किमान तीन ते सात हजाराचा कायमचा लाभ होणार आहे. दिवाळी सारखा मोठा सण दोन महिन्यावर आला आहे. घवघवीत पारितोषकाच्या माध्यमातून श्री रेणुकामाता मल्टिस्टेटच्या सेवकांची दिवाळी खऱ्या अर्थाने आजच झाली आहे.  तारकेश्वर गडाचे महंत शांतिब्रम्ह आदिनाथमहाराज शास्त्री यांचे अध्यक्षतेखाली आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रसिध्द सिने अभिनेते अंकुश चौधरी यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  

याप्रसंगी दैनिक प्रभातचे संपादक जयंत कुलकर्णी,  माजी सहकार आयुक्त बी. डी. पवार, पुण्याचे उद्योजक अॅड. महाजन,  पाथर्डीचे  प्रथम नगराध्यक्ष सुभाषराव घोडके,  माजी मुख्याध्यापक चंद्रकांत गळगट्टे, चंद्रकांत मनवेलीकर, श्रीमंत घुले, शंकर दुपारगुडे, प्रा. जनार्दन लांडे पाटील, अशोक अहुजा,बाळासाहेब चौधरी, विष्णुपंत भालेराव, एस.के.जाखडे, राहुल जोशी, मंगल ताई भालेराव, जयंती भालेराव, मनीषा भालेराव, प्रा.श्रीमती रेखी आदी मान्यवर उपस्थित होते.

         यावेळी आभिनेते चौधरी यांनी, तेराशे सेवक वृंदाचे कुटुंब प्रमुख अर्थतज्ञ डॉ . प्रशांत नाना भालेराव या रत्नपारख्यांनी पारखून निवडलेले पारितोषिक मिळविणारेच माझ्यासाठी खरे सेलिब्रेटी असून त्यांचा सन्मान करण्याची संधी मला उपलब्ध झाली हे माझे भाग्य असल्याची भावना व्यक्त केली. एखादा संस्था चालकच कुटुंबप्रमुख या नात्याने  आपल्या सेवकांच्या पाठीवरून हात फिरवतो, पुरस्कार देऊन कौतुक करतो असा हृद्य प्रसंग अद्याप आपल्या पाहण्यात आला नाही. हा जिव्हाळा निर्माण करून  नानांनी आपली जबादारी वाढविली आहे. याची जाण सर्वानी ठेवावी. असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

      सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष  आदिनाथ महाराज शास्त्री यांनी डॉ प्रशांत नाना अर्थतज्ञ आहेत, माणूस म्हणून त्यांनी मोठे समाजभान जपले आहे. कोणत्याही समाजकार्यात ते आघाडीवर असतात. आपल्या सर्वसामान्य कर्मचार्याच्या दुखान्या बहाण्याची देखील ते जातीने इतकी काळजी घेतात की माझ्या सारख्या संतालाही सर्व सोडून त्यांच्या संस्थेत सेवा करावी असा मोह झाल्याशिवाय रहात नाही, अशा शब्दात नानाच्या कार्याचा गौरव केला.

दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके यांनी आज वैयक्तिक जीवनापासून सर्वत्र  उद्दिष्टांचा जमाना असल्याचे सांगून श्री रेणुका माता मल्टीस्टेटची प्रगती  उद्दिष्टपुर्ती मुळेच होत असल्याचा निर्वाळा दिला. डॉ. भालेराव यांनी चांगले काम करणाऱ्या व उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या सर्वांची संस्थेत जशी दखल घेतली जाते तसेच चूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. प्रसंगी नारळही दिला जातो. हे स्पष्ट करुन  त्यामुळेच संस्थेचा वटवृक्ष होऊन ती  प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचे  नमुद केले. यावेळी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक योगेश केदार, अॅड शिवाजीराव  काकडे, रामदास गोल्हार, वसंतराव झावरे पाटील याचीही भाषणे झाली.

     प्रारंभी दीप प्रज्वलन करून श्री रेणुका माता व स्वर्गीय चंद्रकांत दादा भालेराव व योगेश भालेराव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दैनिक दिव्या मराठीचे  संपादक अनिरुद्ध देवचक्के यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती वीना दिघे यांनी सूत्रसंचालन केले तर अॅड गणेश शेंडगे यांनी आभार मानले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अॅड नितीन भालेराव, उपाध्यक्ष पांडुरंग देवकर,  मुख्य कार्यकारी अधिकारी  हरिचंद्र मोरे, प्रशासकीय अधिकारी कार्तिक, दिनेश टकले, अतुल इथापे, पोपट काळे, सरव्यवस्थापक राजेंद्र नांगरे, अश्वलिंग जगनाडे, गणेश गाढे यांनी विशेष परिश्रम घेतले.