बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश , युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी झाली नियुक्ती
शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पै.साईनाथ आधाट यांनी नुकताच राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
आधाट यांचा लोक संपर्क लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी लगेच आधाट यांच्याकडे युवावर्गात पक्ष वाढीची जबाबदारी देऊन बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सेनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्ष प्रवेश प्रसंगी आधाट यांचे समवेत बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा प्रमुख अनिल शिंदे , बाबुशेट टायरवाले, नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते, महापालिकेचे नगरसेवक अनिल लोखंडे, तालुका प्रमुख आशुतोष डहाळे, बंडू भालसिंग, तसेच शेवगाव येथील त्यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पै.साईनाथ अधाट हे प्रगतिशिल शेतकरी असून शेवगाव नगर परिषदेच्या गेल्या पंचवार्षिक योजनेतील पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षा, तत्कालिन राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्या पद्मा कचरदास आघाट यांचे चिरंजीव आहेत.