वंचितचे कोरडगाव येथील लोकनियुक्त सरपंच म्हस्केंचा शेवगावात सत्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव ग्रामपंचायतीचे वंचित बहुजन आघाडीचे लोकनियुक्त सरपंच भोरू म्हस्के यांच्या विजया प्रित्यर्थ शेवगावमध्ये आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांचे हस्ते सत्कार  करण्यात आला.

      काल मंगळवारी (दि१७ ) शेवगाव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १४ मधील म्हस्के यांच्या चाहत्यांनी
तसेच शेवगाव नगर परिषद कामगार संघटनेच्या वतीने या घरगुती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आदर्श बनसोडे, रमेश ढाकणे,योगेश हवाले, प्रविण बनसोडे, ढाकणे मामा, पाथर्डी महीला तालुका अध्यक्ष सुनिता जाधव, उपाध्यक्ष रोहीणी ठोंबे ,   कामगार संघटना अध्यक्ष रमेश खरात, सुरेश खंडागळे, शेख सलीम जिलाणी, सुरेश जाधव उपस्थित होते.

      यावेळी प्रा. चव्हाण यांनी, पाथर्डी तालुक्याचा गड वंचित बहुजन आघाडीने भोरु म्हस्केच्या नेतृत्वाखाली जिंकला व घराणेशाहीला शह दिला.  अशीच किमया पुढील काळात सर्व समाजातील वंचित बांधवांनी करावी असे आवाहन केले. वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख यांनी आभार मानले.