संजीवनीच्या १० अभियंत्यांची व्हर्चुसा अमेरिकन कंपनीत निवड – अमित कोल्हे

Mypage

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ : संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मागिल बॅचच्या अभियंत्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन दिल्या. या अभियंत्यांनी तेथे उत्तम कामगिरी करून संजीवनीची  विश्वासाहर्ता अधोरेखित केली. यामुळे अनेक नामांकित कंपन्या संजीवनीच्या अभियंत्यांना प्रथम पसंती देत आहे.

Mypage

अलिकडेच व्हर्चुसा या मुळच्या अमेरिकन कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी माहाविद्यालयाच्या अंतिम संत्रातील १० नवोदित अभियंत्यांची मुलाखती घेवुन वार्षिक पॅकेज रू ५ .५ लाखांवर निवड केल्याचे नेमणुक पत्र दिले आहे. अशा प्रकारे संजीवनीच्या प्रयत्नातुन शेकडो ग्रामिण विध्यार्थी नोकरदार होत आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Mypage

 कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, व्हर्चुसा कार्पोरेशन ही एक माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थी हे जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाशी अवगत असले पाहीजे अशी तळमळ संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक कै. शंकरराव  कोल्हे यांची असायची. या दृष्टीने  संजीवनीने व्हर्चुसा बरोबर सामंजस्य करार केला आहे.  या कंपनीने संजीवनीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सही सुरू केले असुन तेथे संजीवनीचे नवोदित अभियंते आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे घेत आहेत.

Mypage

व्हर्चुसा कंपनीने निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये अजिंक्य दिनेश जाधव, वैष्णवी विवेक महाजन, पायल वसंत शिंदे, सुयश  संजय घोलप, युवराज जालिंदर घुले, विराज अनिल रसाळ, क्रिष्णा संजय वर्मा, गौरव दादासाहेब गंदाळ, साक्षी भाऊसाहेब गाढवे व तनुजा साहेबराव निकम यांचा समावेश  आहे.

Mypage

         संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे  व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात या विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डी. बी. क्षिरसागर, डाॅ. बी. एस. आगरकर, डाॅ. डी. बी. परदेशी , डाॅ. ए. ए. बारबिंड, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. व्ही. एम. तिडके उपस्थित होते.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *