शेवगाव प्रतिनिधी, दि.०२ : स्व. विनायकराव मेटे यांनी शिवसंग्राम पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभा राहून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देऊन नेहमीच तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.
मराठा आरक्षण व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सातत्याने आवाज उठवून अनेक प्रश्न मार्गी लावले आहे. याच पद्धतीने जयशिवसंग्राम या संघटनेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात काम करून स्व. मेटे यांचे विचार सामान्यांपर्यंत पोहचवू. असे प्रतिपादन जयशिवसंग्राम पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नवनाथ ईसरवाडे यांनी केले.
जयशिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष रामहरी मेटे तसेच जयशिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेशराव शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर येथे शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (दि.१) जयशिवसंग्राम पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत अहमदनगर जिल्ह्याची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
यावेळी जयशिवसंग्राम पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नवनाथ ईसरवाडे बोलत होते. यावेळी नविन नियुक्त जिल्हा कार्यकारीणी अशी : जिल्हा उपाध्यक्ष – चंद्रभान फटांगडे, शेवगाव तालुका अध्यक्ष – संदीप बामदळे, शेवगाव शहराध्यक्ष – अशोक कुसळकर, युवक तालुका अध्यक्ष – विकास गटकळ, बाबासाहेब गरड, कानिफनाथ धुमाळ, वरून शेटे, निखिल जाधव, सुमित गोरे, ऋषी बर्डे, दादा मस्के यांच्या सह जिल्ह्यातील जयशिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते, उपस्थित होते.