शासकीय चित्रकला परीक्षेत राधाबाई काळे कन्या विद्यालयाचा १००% निकाल

कोपरगाव, प्रतिनिधी, दि. १८ : तालुक्यातील सुरेगाव- कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉईंग परीक्षेत आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत यावर्षीही विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती मुख्याध्यापिका छाया काकडे यांनी दिली.

सप्टेंबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट ग्रेट ड्रॉइंग परीक्षेसाठी राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर या विद्यालयातील 42 विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी अकरा विद्यार्थिनींना ‘अ’ श्रेणी, चार विद्यार्थिनींना ‘ब’ श्रेणी व 27 विद्यार्थिनींना ‘क’ मिळाली आहे. या इंटरमिजिएट परीक्षेमुळे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये श्रेणीनुसार वाढीव सवलतीचे गुण विद्यार्थिनींना मिळणार आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षक यांचे मा. आमदार अशोकराव काळे साहेब, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आ.आशितोष दादा काळे साहेब, स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा पुष्पाताई अशोकराव काळे, विद्यालयातील सर्व कमिटीचे अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापिका छाया काकडे, उपमुख्याध्यापक मधुकर गोडे, पर्यवेक्षक सुरेश खंडिजोड, गुरुकुल प्रमुख आभाळे प्रभाकर, इतर सर्व सेवकरुंद, पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थिनींना विद्यालयातील कलाशिक्षक सोमनाथ शिंदे व संभाजी पोटे यांचे मार्गदर्शन लाभले.