संजीवनी एमबीएचे डाॅ. मालकर यांची अभ्यास मंडळावर निवड

Mypage

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १८ : येथिल संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज अँड एमबीए महाविद्यालयातील एमबीए विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. विनोद मालकर यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ‘मार्केटींग मॅनेजमेंट’ या विषयाच्या अभ्यास मंडळावर पाच वर्षांसाठी निवड झाली आहे. डाॅ. मालकर यांच्या निवडीने संजीवनी मधिल प्राद्यापकांची आपापल्या विषयाची सखोल जान अधोरेखित झाली आहे, अशी  माहिती महाविद्यालयाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Mypage

डाॅ. मालकर यांच्या निवडीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी डाॅ. मालकर यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. विश्वस्त सुमित कोल्हे व डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर यांनीही त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Mypage

      खरं तर सावित्रीबाई फुुले पुणे विद्यापीठाला फार मोठी शैक्षणिक परंपरा व वारसा आहे. या विद्यापीठाच्या अखत्यारीत पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील १८१ एमबीए शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. या सर्व महाविद्यालयांमधुन मार्केटींग मॅनेजमेंट या विषयाच्या अभ्यास मंडळावर संजीवनी एमबीएच्या डाॅ. मालकर यांची निवड होणे, ही बाब कोपरगांव तालुक्याला भूषणावह आहे. त्यांच्यात एमबीए क्षेत्रातील जागतिक पातळीवर नवनवीन बदलांचा, कार्पोरेट जगताला हव्या असलेल्या ज्ञानाधिष्ठीत  व्यक्तींचा अभ्यास असल्यामुळे विद्यापीठाने त्यांची दखल घेतली, ही बाब अभिनंदनिय आहे. त्यांच्या पुर्ण टीम कडून मार्केटींग मॅनेजमेंट या विषयाच्या अभ्यासक्रमाची वर्ल्डक्लास पुनररचना होवुन अनेकांना चांगली नोकरी निश्चित मिळेल तर काही विध्यार्थी त्यांचा स्वतःचा उद्योग व्यवसाय करू शकतील असे मत अमित कोल्हे यांनी व्यक्त केले.
 

Mypage