कोपरगाव मध्ये दोन गटात फ्रिस्टाईल मारामारी

Mypage

नगपालीकेचे माजी सभापती गंभीर जखमी

Mypage

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : कोपरगाव शहरात पंतग उडवताना मोठ्याने आरडा ओरड केल्याचा राग मनात धरुन दोन गटात तूंबळ हाणामारी झाल्याने यामध्ये नगरपालीकेच्या आरोग्य विभागाचे सभापती व शिवसेनेचे नगरसेवक अनिल उर्फ कालु आप्पा आव्हाड हे गंभिर जखमी झाल्याने नहरात एकच खळबळ उडाली.

tml> Mypage

या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहीती अशी की, कोपरगाव शहरातील मोहिनीराज नगर येथील नगरसेव व नगरपालिका आरोग्य विभागाचे माजी सभापती यांचे पुतणे सोनू आव्हाड यांची व मनसेचे पदाधिकारी सतिश काकडे यांचे बंधू बापू काकडे यांच्यामध्ये रविवारी पतंग उडवताना आरडाओरड करण्यावरुन बाचाबाची झाली.

Mypage

त्या संदर्भात शहर पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटा विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेचा राग मनात धरुन मनसेचे काकडे परिवार व शिवसेनेचे आव्हाड परिवार या दोघांमध्ये पुन्हा दुसऱ्या दिवशी राञी दहा वाजता बाचाबाचीचे रुपांतर मारामारीत झाले.

Mypage

नगरसेवक अनिल आव्हाड यांचे पुतने सोनु आव्हाड व बापू काकडे यांनी एकमेकांना लोखंडी गजाने मारहान करत असल्याचे दिसताच दोन्ही गटातील सदस्य एकमेकांमध्ये भडकल्याने तुंबळ मारामारी सुरू झाली. यामध्ये लोखंडी, गज, लाठ्या काठ्या सह लोखंडी राॅडने एकमेकांवर हल्ला करीत राडा केला. यामध्ये नगरसेवक अनिल आव्हाड यांच्या मानेला गंभिर इजा झाली तसेच गणेश काकडे, सोनू आव्हाड व गणेश पंडोरे हे जखमी झाले. 

Mypage

 दरम्यान या घटनेची माहीती पोलीसांना कळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाल्यामुळे पुढचा अनर्थ टळला अन्यथा या घटनेत नको ते घडले असते अशी माहीती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिले ते पुढे म्हणाले झालेल्या घटनेबद्दल पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता वाद करणाऱ्या दोन्ही गटाची धरपडक सुरू केली. पोलीस येताच मारामारी करणाऱ्या दोन्ही गटाचे सदस्य शेजारच्या काटवणात पसार झाले. पोलीसांनी राञभर शोध सुरु केला. 

Mypage

दरम्यान गणेश पंडोरे यांच्या तक्रारी वरुन पोलीस स्टेशनमध्ये मारामारी संदर्भात गुन्हा दखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर चा तपास पोलीस करीत आहे. या घटनेत जखमी झालेल्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे.   मोहिनीराजनगर भागात पोलीसांचा खडा पारा असुन या भागातील वातावरत तणावपूर्ण शांततेत आहे.

Mypage