सर्वधर्मीय शांतता समितीच्या बैठका नियमित व एकत्रित घ्याव्या- विजय वहाडणे

Mypage

समाजकंटकाच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी धार्मिक स्थळावर सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवावे- विजय वहाडणे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : कोळगावथडी येथे समाजकंटकाने धार्मिक ग्रंथाची पाने फाडून केलेल्या विटंबनेचा सकल हिंदू समाजाच्यावतीने कालच निषेध करण्यात आला. सदर घटना निंदनीय आहे. कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तसे निवेदन देऊन दोषी समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र धार्मिक स्थळ कुठले का असू द्या सर्व ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवले तर अशा समाजकंटकाच्या कृत्यांना आळा घालणे शक्य होईल. शासनाने त्यासाठी पुढाकार घेवून आदेश द्यावेत अशी मागणी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.

Mypage

 प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हंटले कि, शासनाने मंदिराप्रमाणेच सर्व मस्जिदी-चर्च व सर्वच धार्मिक स्थानांवर सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्याचा आग्रह धरणे गरजेचे आहे. तरच अशा समाजकंटकांना आळा घालणे शक्य होईल. त्यामुळे धर्मग्रंथाची विटंबना सारखे प्रकार घडणार नाही. तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांनी सर्वधर्मीय-सर्वपक्षीय शांतता समितीच्या एकत्रित बैठका नियमितपणे घेतल्या पाहिजेत.

Mypage

हिंदू धर्मांच्या सण-उत्सावाच्या वेळी केवळ काही हिंदू कार्यकर्ते-संघटना व मुस्लिमांच्या धार्मिक सणांच्यावेळी फक्त काही मुस्लिम कार्यकर्त्यांच्या बैठका स्वतंत्रपणे न घेता शांतता समितीच्या संयुक्त बैठका घ्याव्यात. त्यामुळे हिंदू-मुस्लिम कार्यकर्ते-नेते यांच्यात समन्वय ठेवता येईल व गैरप्रकारांना आळा घालणे सोपे होईल, असे वहाडणे म्हणाले.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *