निविदावर कारवाई करा अन्यथा उपोषण आंदोलन, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा इशारा

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या निविदा लवकर उघडून कारवाई करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने शेवगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन राऊत यांचेकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

Mypage

   शेवगाव शहराच्या पाणीपुरवठाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियानांतर्गत पाणीपुरवठ्यासाठी ७२ कोटी रुपये दिलेले आहेत.  या कामाच्या निविदा २४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झाल्या. निविदा उघडण्याची तारीख २२ डिसेंबर २०२२ होती. परंतु अद्याप पर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

tml> Mypage

तसेच याबाबत कोणतेही कारण दिलेले नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे विलंब होत आहे. शेवगावच्या ५० हजार लोकांच्या भावनांशी हा खेळ होत असल्याचा आरोप यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे यांनी केला.

Mypage

       तरी याबाबत लवकरात लवकर योग्य कारवाई करून कार्यारंभ आदेश द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी या निवेदनाद्वारे केली.कार्यारंभ बाबत लवकरात लवकर आदेश झाला नाही तर आपण शेवगाव नगर परिषदे समोर उपोषण करणार असल्याचेही डहाळे यांनी नमुद केले आहे.

Mypage

निवेदनावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट, तालुका प्रमुख अशूतोष डहाळे, संदिप लांडगे, प्रभाकर गायकवाड, विशाल परदेशी, विकास गंगावणे, मनोज राऊत, विकास भागवत, लक्ष्मण वाघमोडे, अजय मगर, वैभव लांडे, प्रदीप ससाने आदि कार्यकत्र्यांच्या सह्या आहेत.

Mypage

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी अहमदनगर, पोलीस निरीक्षक शेवगाव, तहसीलदार शेवगाव यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहेत ‌‌. 

Mypage