विजचोरी विरोधात महावितरणची मोहिम

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : तालुक्यात महाविरण कंपनीने अनधिकृत ग्राहकांना वेळोवेळी सांगुनही ग्राहक अधिकृत कनेक्शन घेत नाही किंवा अधिकृत कनेक्शन असले तरी वीजचोरी काही थांबत नाही. त्यामुळे तालुक्यातील सवंत्सर कक्षाचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र बोरसे यांनी करंजी, नऊचारी, पढेगाव परिसरात वीजचोरी रोखण्यासाठी मोहिम राबवली या मोहिमेत एकुण २० ग्राहक सापडले असुन त्यात कृषीपंपाच्या कनेक्शनवर घरगुती वीजवापर करणे, अधिकृत कनेक्शन असुनही विज चोरुन वापरणे. वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

जे शेती व घरगुती ग्राहक अनधिकृत पणे विजेचा वापर करतात अशा ग्राहकांनी आपले वीज कनेक्शन अधिकृत करून घ्यावी, तसेच कोणीही सिंगल फेज शेती पंप मोटर, हीटर, शेगडी, कुट्टी मशीन आदी उपकरणांचा वापर करू नये अन्यथा येणाऱ्या काळात अशा अनधिकृत वीज वापरणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल प्रसंगी दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे वीज वितरण कंपनी संवत्सर कक्षाचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र बोरसे यांनी सांगितले.