आखेगाव येथे दोघा शेतमजुरांचा संशयास्पद मृत्यू

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : तालुक्यातील आखेगाव येथे कपाशीवर औषध  फवारणी करणाऱ्या दोघा शेतमजुरांचा काल शुक्रवारी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला आहे. वैभव आबासाहेब बिडकर (वय २८,रा. आखेगाव तालुका शेवगाव )व कृष्णा बबन काकडे (वय ३० रा.सोमठाणे तालुका पाथर्डी )अशी मृतांची  नावे असून त्यांच्यासोबत असलेले  चार जण गायब झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी घातपातीचा संशय व्यक्त केला आहे.   

Mypage

      शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास  औषध फवारणी नंतर ते सोमठाणा शिवारातील शेतात बसले होते.  घरी येण्यास उशीर झाल्याने घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता  त्यावर अन्य व्यक्तींकडून  दोघे तिथे पडल्याची माहिती समजल्यावर  नातेवाईक घटनास्थळी गेले. त्यांनी दोघांना शेवगाव रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने कृष्णा काकडे यास शेवगाव येथे तर वैभव बिडकर यास नगर येथे रुग्णालयात पाठविले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. 

Mypage