कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : अहमदनगर जिल्हयातील नावलौकीक प्राप्त कोपरगांव पिपल्स बँकेने सन 2021-22 मध्ये रिझर्व्ह बँकेचे सर्व निकषांचे पालन करीत ग्रॉस एनपीए 5 टक्केचे आत ठेवल्याबद्दल अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनचे वतीने नुकताच सन्मान करण्यात आला.
अहमदनगर जिल्हा बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष चार्टर्ड अकौंटंट गिरीष घैसास यांचे उपस्थितीत मालपानी उदयोग समुहाचे सर्वेसर्वा राजेश मालपाणी यांचे हस्ते सदरचा पुरस्कार बँकेचे चेअरमन सत्येन सुभाष मुंदडा यांना सुपुर्द करण्यात आला.
याप्रसंगी बँकेचे जेष्ठ संचालक व माजी चेअरमन कैलासचंद ठोळे, संचालक सुनिल बंब असोसिएशनचे उपाध्यक्ष नाथाजी राउत उपस्थित होते. सध्याच्या मंदीच्या वातावरणात थकबाकी वसुलीस येत असलेल्या अडचणींवर मात करीत तसेच रिझर्व्ह बँकेचे सर्व निकषांचे पालन करीत एनपीए चे प्रमाण 5 टक्केचे आत ठेवण्यात बँकेने यश मिळविले आहे. बँकेने मागील आर्थिक वर्षात सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान प्रगतीची घोडदौड कायम ठेवून बँकेस लेखापरीक्षण वर्ग ‘अ’ कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.
नुकत्याच झालेल्या सभासदांचे वार्षिक सभेतही बँकेने सभासदांना 15 टक्के लाभांश जाहिर केला आहे सदरचा 15 टक्के लाभांश जाहिर करणारी पिपल्स बॅक जिल्हयातील एकमेव बँक ठरणार आहे. बँकेने डिजीटल क्षेत्रात पाउल टाकतांना ग्राहकांना मोबाईल बॅकींग, युपीआय सेवा सुरु केली असुन ग्राहकांना निश्चीतच याचा लाभ होत आहे.
या सर्व प्रगतीमध्ये सभासद, ग्राहक, संचालक व सेवकवर्ग यांचा मोलाचा वाटा असुन त्यांचे सहकार्यामुळेच आजचा पुरस्कार प्राप्त होत आहे असे चेअरमन श्री सत्येन मुंदडा यांनी सांगीतले. बँकेचे उपाध्यक्ष सौ. ‘प्रतिभा शिलेदार, संचालक सर्वश्री डॉ. विजय कोठारी, सुनिल कंगले, रविंद्र लोहाडे, धरमचंद बागरेचा, कल्पेश शहा, अतुल काले, राजेंद्र शिंगी, हेमंत बोरावके, वसंतराव आव्हाड, यशवंत आबनावे, रविंद्र ठोळे, प्रभावती पांडे, अॅड. संजय भोकरे, प्रसन्ना काला, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे, असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड, सेवक संचालक विरेश पैठणकर यांचेही आभार मानन्यात आले.