नवजीवन विद्यालयात आकाश कंदील कार्यशाळा संपन्न

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्राचार्य अशोक उगलमुगले  यांच्या मार्गदर्शनाखाली आज नवजीवन विद्यालय दहिगाव-ने येथे दीपावलीच्या निमित्त इयत्ता ५वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांची इकोफ्रेंडली आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.   

Mypage

      या कार्यशाळेत माधुरीम्हस्के, सीमा धिमते, सुनिता मकासरे, विश्वनाथ सोनवणे, सिकंदर शेख यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थ्यांनी त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत अनेक प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुंदर व आकर्षक असे आकाश कंदील बनविले.

Mypage

     या उपक्रमावेळी विद्यालयाचे उपप्राचार्य शंकर कांबळे, पर्यवेक्षक सुनील शिंदे, मोहिटे, भावान पागर, धनंजय वैद्य, गणेशपवार, एकनाथ पवार, अप्पासाहेब खंडागळे आदि शिक्षक वृंद उपस्थित होते. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *