लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ :   लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने रविवार दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी कोपरगाव शहरातील विविध शाळेना तब्बल साडे पाच लाख रुपये किमतीचे विविध शालेय उपयोगी साहित्याचे वाटप शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयजी विद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आले अशी माहिती लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष परेश कृष्णा उदावंत यांनी दिली.

लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील एकलव्य आदिवासी आश्रम शाळेस विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ४२ बेंचेस, ४ टेबल व ५ खुर्च्या देण्यात आल्या तसेच श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयास १० टेबल, १० खुर्च्या व क्रीडा साहित्य तसेच साई आश्रय अनाथ आश्रम शाळेस २ पुस्तक मांडणी व विविध पुस्तके असे एकूण साडेपाच लाख रुपये किंमतीचे साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी पुणे येथील पी.एम.सी.सी फत्तेचंद राका, सारसबाग येथील लायन्स अनिल सुगंधी,  झेडसी लायन्स सुधीर डागा, कोपरगाव लायन्स क्लबचे सचिव लायन्स बाळासाहेब जोरी, ट्रेझरर अंकुश जोरी,लायन्स खुबानी, लायन्स सत्येनं मुंदडा, अक्षय गिरमे, भास्कर सर, वैभव उदावंत, जय दारुणकर, कैलास नागरे, लियो क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष सुमित सिंनगर, यश बंब, धीरज काराचीवाला आदी लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे पदाधिकारी, शालेय शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोजेक्ट मॅनेजर लायन्स राजेश टोळे यांनी तर सूत्रसंचालन लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे माजी अध्यक्ष लायन्स राम थोरे यांनी केले

शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपल्यानंतर लायन्स फत्तेचंद राका  यांनी कोपरगाव येथील प्रसिद्ध सोने चांदीचे व्यापारी लायन्स तुळशीदास खुबानी यांच्या एस.एस.के वार्ड रोब या ज्वेलरी दालनास भेट दिली  असता त्या प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष परेश उदावंत यांनी बोलताना सांगितले की, लायन्स क्लब नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते इथून पुढील काळात देखील कोपरगाव लायन्स क्लब समाजाप्रती आपले सेवा कार्य असेच चालू ठेवत विविध प्रामुख्याने रक्तदान शिबिरे व शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आदी कार्यक्रमाचे नियोजन नेहमी करण्यात येईल अशी ग्वाही  या प्रसंगीलायन्स क्लबचे अध्यक्ष उदावंत यांनी दिली.