कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत शिवराळ भाषेचा वापर करून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्याचे पडसाद कोपरगाव तालुक्यात देखील पडले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून ती प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला.
सुसंस्कृत महाराष्ट्र अशी देशात वेगळी ओळख असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राची राजकारणाची देखील संस्कृती आहे. लोकशाही म्हटले की, टीका टिप्पणी आलीच तो राजकारणाचा एक भाग आहे. मात्र टीका टिप्पणी करतांना मर्यादा पाळणे गरजेचे आहे.मात्र दुर्दैवाने संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत अतिशय खालच्या थराची वापरली गेलेली भाषा पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही ती या पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे खा. सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत अशा प्रकारचे वक्तव्य हे निंदनीय व निषेधार्ह आहे त्यामुळे या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो.- आ. आशुतोष काळे
खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राज्यभरातून त्यांचा निषेध केला जात असतांना कोपरगावमध्ये देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे म्हणाले की, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो.
खा. सुप्रिया सुळे महाराष्ट्राचे भूषण आहेत. सलग सात वेळा संसदरत्न पुरस्कार मिळविणाऱ्या देशाच्या त्या एकमेव खासदार आहेत. अशा व्यक्तीबद्दल त्यांनी निंदनीय वक्तव्य केले त्याचा निषेध करीत आहे. ५० खोक्याचा विषय मोठ्यापासून लहानापर्यंत चर्चिला जात आहे. कुठे तरी सत्तेची गुर्मी दिसत असून महिलांच्या बाबतीत सत्ताधारी मंत्र्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य केले जात आहे.
देशामध्ये महिला धोरण राबविण्यात शरदचंद्र पवार यांचा पुढाकार होता, महिला आरक्षण त्यांच्यामुळे मिळाले त्यांच्या कन्येबद्दल खालच्या पातळीवरून जावून वक्तव्य केल्यामुळे राज्य सरकारने त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अन्यथा याचे चुकीचे पडसाद उमटून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील असा ईशारा दिला आहे.
यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र महिलांचा आदर करीत आला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी व जलील अत्तार म्हणाले की, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य महाराष्ट्रासाठी व सर्व महिला भगिनींसाठी निंदनीय आहे.सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, महिला जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, माजी नगरसेवक मंदार पहाडे, दिनकर खरे, सौ. भाग्यश्री बोरुडे, सौ. शितल वायखिंडे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, डॉ. तुषार गलांडे, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर मस्के, प्रकाश दुशिंग,
जावेद शेख, बाळासाहेब रुईकर, वाल्मीक लहिरे, ऋषिकेश खैरनार, आकाश डागा, शैलेश साबळे, राजेंद्र जोशी, इम्तियाज अत्तार, एकनाथ गंगुले, संभाजी नवले, बाळासाहेब वारकर, राजेंद्र आभाळे, बाळासाहेब सोनटक्के, महेश उदावंत, अनिरुद्ध काळे, सोमनाथ आढाव, संदीप सावतडकर, पुंडलिक वायखिंडे, ऋतुराज काळे, किशोर डोखे, अक्षय आंग्रे, अखिल चोपदार, सागर लकारे, विकी जोशी, गणेश बोरुडे, मनोज नरोडे, तेजस साबळे, युसूफ शेख, संतोष शेजवळ, अभिषेक कोकाटे, रोशन शेजवळ, प्रथमेश होले, विशाल गुंजाळ, अझर शेख, शकील शेख, हारुण शेख, राहुल राठोड, सोमेश शिंदे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.