कोपरगांव प्रतिनिधी, दि. १४ : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डाॅ. माधुरी जावळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांच्या अध्यापन आणि संशोधनातील नाविन्यपूर्ण पध्दती, नवोपक्रम, इत्यादी बाबींमधिल योगदानाची दखल घेवुन प्रतिष्ठित समजला जाणारा ‘उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी’ पुरकाराने सा.फु. पुणे विद्यापीठात शानदार कार्यक्रमात सन्मानित केले. हा पुरस्कार त्यांना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. कारभारी काळे व उपकुलगुरू डाॅ. संजय सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आला, अशी माहिती संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की सा. फु. पुणे विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी 10 फेब्रुवारी या स्थापना दिनाच्या दिवशी विद्यापीठातील अखत्यारीतील राजकिय, सामाजीक क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, विविध महाविद्यालये व तेथिल शिक्षक, प्राचार्य यांना त्यांच्या क्षेत्रातील भरीव कामगिरीबध्दल पुरस्कार देवुन गौरविण्यात येते. ग्रामिण भागातील महाविद्यालयांमधुन चालु वर्षी डाॅ. जावळे या बेस्ट इनोव्हेटीव टिचर पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. यापुर्वीही त्यांना २०२० साली विद्यापीठाचा बेस्ट टिचर पुरस्कार प्राप्त झाला होता.
डाॅ. जावळे या मागील २२ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असुन त्यांच्या विभागाला एआयसीटीई, नवी दिल्लीचे तीन वेळा एनबीए मानांकान प्राप्त झाले आहे. तसेच त्यांना विद्यापीठाकडून पी. एचडी गाईडची मान्यताही प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांकडून समाज उपयोगी प्रोजेक्टस तयार करून घेणे, विध्यार्थ्यांना प्रोजेक्ट आधारीत ज्ञान देणे, शिक्षणात आधुनिक पध्दतींचा अवलंब करणे, इत्यादी बाबींची दखल विद्यापीठाकडून घेण्यात आली. तसेच एआयसीटीई कडून विविध उपक्रमांसाठी निधी मिळविणे व त्याचा उपयोग प्रशिक्षणासाठी करणे.
या अंतर्गत डाॅ. जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लाॅक चैन अँड सायबर सिक्युरीटी या विषयावर देशातील ९०० पेक्षा अधिक प्राद्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच रोल ऑफ आयसीटी इन टिचिंग लर्निंग या विषयावरही ३०० पेक्षा अधिक प्राद्यापकांना प्रशिक्षित करण्यात आले. तसेच त्यांनी स्कोपस इंडेक्स असलेल्या जर्नल्स मधुन आत्तापर्यंत २२ शोध निबंध सादर केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल सा. फु. पुणे विद्यापीठाने त्यांना बेस्ट इनोव्हेटीव टिचर पुरस्काराने सन्मानित केले.
डाॅ. जावळे यांच्या यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी त्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी धोरणात्मक संचालक (स्ट्रॅटेजिक डायरेक्टर) डाॅ. शांतम शुक्ला व संचालक डाॅ. ए. जी. ठाकुर उपस्थित होते. डाॅ. जावळे यांच्या या उपलब्धीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व विश्वस्त अमित कोल्हे यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीत ग्रामीण भागात अभियांत्रीकी, व्यवस्थापन, औषधनिर्माण शास्त्र, विधी, वास्तुविशारद, इत्यादी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या सुमारे ३५० पेक्षा अधिक संस्था आहेत. या संस्थांमधुन डाॅ. माधुरी जावळे यांची ‘उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी’ पुरस्कारासाठी निवड होणे, ही बाब संजीवनीच्या प्राद्यापकांच्या उत्कृष्टतेची ची पावती आहे. संस्था केवळ भिंती बांधुन उभ्या राहत नाही तर संस्थेत शिक्षक नावाचा आत्मा असावा लागतो, त्यांना जपले पाहीजे, ही संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांची शिकवण होती. त्यानुसार संजीवनीचे व्यवस्थापन शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत असते. त्यामुळे प्रत्येक शिक्षकामध्ये संजीवनी ही माझी संस्था आहे, अशा भावनेतुन ते कार्य करीत असतात. डाॅ. जावळे यांना मिळालेल्या पुरस्काराने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नाव पुन्हा एकदा उत्कृष्टतेच्या यादीत अधोरेखित झाले आहे.- अमित कोल्हे