कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब कोपरगांवच्या वतीने नुकत्याच श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातील गरजु व होतकरु विदयार्थीना सायकल वाटप करण्यात आले. अशी माहिती लायन्स क्लब चे अध्यक्ष परेश उदावंत यांनी दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीरामपुर येथील प्रसिध्द व्यापारी लायन्स आर.सी. सुनिल साठे हे उपस्थित होते. लायन्स राजेंद्र पटेल, कोपरगांव येथिल लायन्स झेड सी सुधीर डागा,कोपरगांव एज्युकेशन सोसा.चे सचिव दीलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, राजेश ठोळे आदी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. कोपरगाव लायन्स क्लबचे सचिव लायन्स बाळासाहेब जोरी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
ट्रेझरर अंकुश जोरी, माजी नगरसेवक लायन सत्येन मुंदडा, लायन राजेंद्र शिरोडे, लायन राजेश ठोळे, लायन सुमित सिंगर, लायन शाम जंगम, लायन राम थोरे, अक्षय गिरमे, सचिन भडकवाडे नितीन भडकवाडे, लायन सुरेश शिंदे, तुषार घोडके, प्रितम बंब, कैलास नागरे आदी लायन्स क्लब कोपरगावचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी लायन्स क्लब सदस्य व मान्यवरांचे विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी स्वागत केले.
विदयार्थीनी संस्कारक्षम शिक्षण घेवुन आई-वडीलांची सेवा करावी,शिक्षण घेतांना मदत करणारे खुप आहेत त्यांची जाणिव ठेवा व प्रामाणिकपणे शिक्षण घ्या असे मत सचिव दिलीप अजमेरे यांनी मांडले. जेष्ठ लायन्स सुधिर डागा यांनी लायन्स क्लबच्या विविध उपक्रमाची माहीती दिली.
संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे, संदीप अजमेरे, राजेश ठोळे, अमोल अजमेरे आदीनी लायन्स क्लब कोपरगांवचे या उपक्रमाबददल आभार मानले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब, कोपरगावचे अध्यक्ष परेश उदावंत यांनी केले ते म्हणाले लायन्स क्लब ने लायन सायकल अंतर्गत हा उपक्रम सुरु केला असुन खेड्यापाड्यातुन पायी येणाऱ्या मुलांची सोय व्हावी हा त्या मागचा उद्देश आहे असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की नेहमीच सामाजिक कार्यात आम्ही अग्रेसर असुन, पुढील काळात देखील समाजा प्रती आपले सेवा कार्य असेच चालू ठेवुन प्रामुख्याने रक्तदान शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे असे स्पष्ट केले. या कार्यक्रमाला श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड,पर्यवेक्षक श्रीमती उमा रायते सर्व लायन्स सदस्य,शिक्षक विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.