कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : देव तारी त्याला कोण मारी यांचा प्रत्यय कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आला. रेल्वे प्रवासात दरम्यान एका परप्रांतीय गरोदर मातेची अवघड प्रसुती सुखरुप करुन बाळासह मातेचा जीव वाचवण्यात कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. वेळेत योग्य पध्दतीने प्रसुती केल्यामुळे जीव धोक्यात गेलेल्या गरोदर मातेस नवजात बालकाला जीवदान देवुन देवता सारखी भूमिका बजावणाऱ्या डॉ डॉक्टरांचे सर्वञ कौतूक होत आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, रिटा देवी व दिपक कुशवाल हे जोडपे पाणीपुरीच्या व्यवसाया निमित्य कर्नाटक मध्ये शाहपुर मध्ये राहतात ते मुळचे झाशी उत्तर प्रदेश येथील आहेत. रिटा देवी ही महिला ९ महीण्याची गरोदर होती. या पुर्वी तिचे दोन बाळंतपणे सिजरीयन सेक्शनने झाली होती त्यात पहील्या बाळाचा मृत्यु झाला होता.
आता पुन्हा ती तिसऱ्यांदा गरोदर असल्याने ९ व्वा महीणा सुरू होता. त्यामुळे ते आपल्या मुळ गावी जाण्यासाठी आपल्या पतीसह कर्नाटक एस्कप्रेस या रेल्वे ने कर्नाटक शाहपुर येथून उत्तर प्रदेश झाशी येथे जाण्यासाठी २१ एप्रिलला सकाळी ०४ वाजता निघाले ते कोपरगांव च्या जवळपास आल्यानंतर संबंधीत महिलेला अचानक प्रसुतीच्या तिव्र वेदना सुरु झाल्या.
प्रसुतीच्या वेदनेने व्याकूळ झालेल्या महिलेला रेल्वेमधुन कोपरगांव स्टेशनवर दुपारी ०३ वाजता उतरवण्यात आले. संबंधीत महिलेला व तिच्या पतीला कोपरगाव मधील काहीच माहिती नसल्याने प्रसुतीच्या कळांनी व्याकुळ झालेल्या पत्नीला एका रिक्षा मध्ये बसवून त्याच रिक्षावाल्याला दवाखान्यात घेवून जाण्याची विनंती केली. रिक्षावाल्याने एका खाजगी रुग्णालयात त्यांना सोडले. संबंधीत डॉ डॉक्टरांने गरोदर महिलेची तपासणी केली असता. प्रसुती करणे कठीण आहे तसेच मातेस बाळाच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात येताच त्या डाॅक्टराने थेट शासकीय रूग्णालयाचा रस्ता दाखवला.
कोपरगाव ग्रामीण रूग्णालयाच्या दारात परप्रांतीय गरोदर महिला अवघडलेल्या अवस्थेत प्रसुतीच्या वेदनेने विव्हळत असल्याचे पाहुन कोपरगांव येथे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन यादव यांनी तातडीने संपूर्ण वैद्यकीय यंञणा सतर्क करुन वैद्यकीय तपासणी व प्राथमिक उपचार सुरू केले.
यावेळी गरोदर मातेच्या पोटातील बाळ पायाळू दिसले तसेच नवजात बाळाने मातेच्या पोटातच विष्ठा केली होती सोबतच नवजात बाळाच्या हृदयाचे ठोके सामान्य स्थितीपेक्षा अधिक वेगाने पडत होते. अशातच गरोदर मातेला प्रसुतीच्या वेदना जीवघेण्या होत होत्या. वैद्यकिय अधिक्षक डॉ. सचिन यादव, डॉ. कृष्णा फुलसौंदर व परिचारीका कल्पना धाकराव यांनी त्वरीत निर्णय घेऊन स्त्रीरोग तज्ञ डॉ. योगेश लाडे, भुलतज्ञ डॉ. विजय कर्डीले बालरोग तज्ञ डॉ. अतिश काळे यांना तातडीने पाचारण करुन संबंधीत महिलेचे साजरा अर्थात शस्त्रक्रिया करून प्रसुती सुखरूप केली. यात माता व बाळ सुखरुप आहे.
तिसरे सिझेरीयन असल्याने प्रसुतीच्या वेळेत थोडाजरी विलंब झाला असता तर आई व बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. तात्काळ उपचार मिळाल्याने सध्या बाळ व माता दोघांना जीवदान देण्यात कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय पथकाला यश आले. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकीय यंञणा देवदूता सारखी वेळेत धावून गेल्यामुळे दोन जीवांना जीवदान मिळाले.