कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील सखाराम लांडगे यांच्या दोन शेळ्या वर बिबट्या ने हल्ला चढवत त्यांना मारुन टाकल्याने माहेगाव देशमुख परिसर बिबट्याच्या अधिवासाने भयभीत झाला आहे.
माहेगाव देशमुख ग्रामपंचायत समोर लांडगे वस्ती मध्ये सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गोठ्या बाहेर बांधलेल्या विस हजार रुपये किंमती च्या दोन शेळ्या वर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागिच म्रत्यु झाला. कुत्रे जोर जोराने भुंकण्याचा आवाज ऐकून लांडगे वस्ती वरील लोक जागे झाले तेंव्हा बिबट्या त्यांना बघुन मकाच्या शेतात पसार झाला दावे बांधले ल्या ऐका शेळीचे नरडे फोडले, तर एकिचे पोट हल्ला झालेल्या ठिकाणी शेतामधील माती मध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे भर वस्ती मध्ये आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहे.
दोन दिवसापूर्वी माहेगाव देशमुख कुभांरी शिवे वर असणाऱ्या वन जमिनीलगत शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या भिमा माळी यांच्या कळपातील एक शेळी बिबट्या ने अलगत उचलून नेत राखीव वनात नेवून फडशा पाडला तालुक्यात गोदावरी नदीच्याच्या तिरावर बारमाही ऊसाची व मक्याची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याच्या अधिवासाचे दर्शन नागरिकांना होत असते तालुक्यात मणुष्य हाणीचे प्रकार घडले नसल्याची नोंद झाली नसली तरी शेतकऱ्यांच्या पशुधना वर बिबट्या चे सातत्याने हल्ले होत असतात मंजूर शिवारात उपासमारी मुळे बिबट्या म्रुत पावल्याची घटना नुकतीच घडलेली आहे.
मानवाचे निसर्गावर होत असलेले अतिक्रमण भविष्यात जगंली श्वापद व मानव लढाई सुरू झाल्याची नांदी पर्यावरण तज्ञ वारंवार बोलुन दाखवत आहे. जंगली श्वापदांना अधिवास क्षेत्रात मुबलक प्रमाणात तु्र्णभक्षी पाणी प्राणी उपलब्ध झाले तरच माणवी वस्ती कडे होणारी जंगली प्राण्याची आगेकूच थांबणार आहे. वन विभागाने या परिसरात पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त होण्याबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा योग्य मोबदला मिळण्याची मागणी उल्हास काळे यांनी वन विभागाकडे केली आहे.