बाजार समितीच्या विकासाची ही लढाई – जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : सलग 14 वर्ष खर्चाचे कारण सांगून आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना कुरण उपलब्ध करून त्यांना राजकारणात वापरण्यासाठी बाजार समितीचे वाटोळे केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी केला. परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरगाव वारी, धोत्रा येथील मतदारांशी  ते बोलत होते.

यावेळी काँग्रेस तालुका प्रमुख आकाश नागरे, तुषार पोटे, नितीन शिंदे उमेदवार संतोष ठक्कर सुनील कोठारी माजी  भारत मोरे असलम शेख उपस्थिती होते,अध्यक्षस्थानी रावसाहेब टेके होते. 1980, 90 च्या दशकात महाराष्ट्र अग्रेसर असलेली भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेली बाजार समिती हळूहळू कार्यकर्त्यांचा अड्डा बनवून उध्वस्त झाली. उप बाजार समिती राहत्यात ही मुख्य बाजार समिती वर्ग करण्यापर्यंत वेळ आली. याला जबाबदार कोण? बैल बाजारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, परवाना नूतनीकरणात भ्रष्टाचार एका दिवाळीत तर कामगारांच्या नावावर कर्ज काढून संचालकांना दिवाळी बोनस वाटला  इतकी वाईट परिस्थितीचा बाजार समितीची झाली.

विधानसभेत जिल्हा परिषद पंचायत समिती एकमेकांना विरुद्ध लढायचं. कार्यकर्त्यांनी गावातील, गावपातळीवर संघर्ष करायचा कार्यकर्त्यांच्या ग्रामपंचायत सोसायटी निवडणुकात एकमेकांची डोकी फोडायची. यांनी मात्र आपल्या सोयीसाठी कधीही एकत्र यायचं हे सगळे एकच आहेत. फक्त सत्तेकरिता कार्यकर्त्यांना झुंजवतात. ही वस्तुस्थिती आहे. कांदा मार्केट सोडल तर भुसार मार्केटची वाट लागली. शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधा नाही, व्यापारांचा परराज्यात गेल्याल्या मालाचे कोट्यावधी रुपये अडकून पडतात, त्यासाठी काही करत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या पैशावर राजकारण चालते, त्याच शेतकऱ्यांची कामधेनु अडचणीत आली.

14 वर्ष कार्यकर्ते सांभाळताना बाजार समितीचे वाटोळे झाले. अशी टीका प्रमोद लबडे यांनी केली. अध्यक्ष रावसाहेब टेके म्हणाले की, विकासासाठी पन्नास वर्षापासून ही नेते मते मागतात, निवडून येतात, मग आपले कोपरगाव बाजारपेठची  अवस्था काय?  बाजार समितीच्या बाबतीत शेतकऱ्यांचे विश्वासहारता कुणामुळे संपली. शेतकरी विंचूर, लासलगाव, बसवंत पिंपळगाव, वैजापूर, राहता बाजार समितीकडे कोणामुळे वळला याला जबाबदार कोण? कार्यकर्त्यांना गृहीत धरायचे वापरून घ्यायचे, धाकात ठेवायचे, लाडक्या व कानाखलाच्या  कार्यकर्त्याला जवळ घ्यायचे. अशी राजनीती कोपरगावात चालल्यामुळे चांगल्या संस्थेचे वाटोळे झाल्याचे ते म्हणाले.

सामान्य शेतकरी व व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधी बाजार समितीत जावा यासाठी आमचा प्रयत्न होता. मात्र अगोदरच वाटाघाटी असून आपल्या १४ वर्षाच्या परंपरेला आबाद ठेवण्यासाठी ही फसवणूक तालुक्याच्या नेत्यांनी केली. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीच ही निवडणूक होत असून, सामान्य जनता या निवडणुकीत परिवर्तन करील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी परिवर्तन पॅनलचे उमेदवार संजय दंडवते, रंगनाथ गव्हाणे, गयाबाई जावळे, विष्णुपंत पाडेकर तसेच पोपटराव गोर्डे, अशोकराव कानडे, गोरख टेके, मच्छिंद्र नवले, बाबासाहेब वारकर तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.