साडे तीन वर्षात पूर्व भागाच्या विकासाला चालना मिळाली – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा विकास साधतांना मतदार संघाच्या सर्व गावांना विकासात सहभागी करून घेतले असून मागील साडे तीन वर्षात दिलेल्या कोट्यावधीच्या निधीतून पूर्व भागाच्या विकासाला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे ४ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या प्र.जि.मा. ५ रवंदे-टाकळी-पवार गिरणी-संवत्सर-भोजडे-धोत्रे रस्ता डांबरीकरण करणे तसेच २० लक्ष रुपये निधीतून इजिमा २१५ धोत्रे ते वारी रस्ता डांबरीकरण करणे व १० लक्ष रुपये निधीतून दिलीप रोकडे घर ते घोयेगाव चौफुली रस्ता खडीकरण करणे कामाचे या ४ कोटी ३० लाखाच्या कामांचे भूमिपूजन व मस्जिद परीसरातील पेव्हिंग ब्लॉक बसविणे कामाचे लोकार्पण नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, पूर्व भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले आहे. कोकमठाण व परिसराच्या गावातील नागरिकांचे श्रद्धास्थान श्री लक्ष्मीमाता देवस्थान तसेच वारी व परिसराचे श्रद्धास्थान असलेल्या वारी येथील श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिला. पूर्व भागातील शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांची विजेच्या समस्या दूर करण्यासाठी वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढविली.

नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षापासून त्याच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नव्हता. त्यासाठी पाठपुरावा करून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवून दिला. पूर्व भागातील गावा-गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना व कोपरगाव शहराला जोडणाऱ्या रस्त्यांना निधी देवून दळणवळणाची समस्या सोडविली.

संवत्सरला ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहत तसेच तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला देखील मंजुरी मिळवून पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. पूर्व भागातील वारी येथील गोदावरी नदीरील पूल, वारी-शिंगवे रोड, प्र.जी.मा. ९९, शिरसगाव, तिळवणी अशा अनेक महत्वाच्या पुलांचा प्रश्न सोडवून अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना देखील मार्गी लावून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून पूर्व भागाच्या विकासाला चालना दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी मस्जिद परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धोत्रे येथील मुस्लिम बांधवांनी आ. आशुतोष काळे यांचा सत्कार केला.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुरेश जाधव, जिनिंग, प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, माजी पं. स. सदस्य मधुकर टेके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, तालीफ सय्यद, शिवनाथ पाडेकर, देविदास जानराव, संजय चव्हाण, मोहम्मदशेख, चांगदेव चव्हाण, रमेश भोसले, नवनाथ पाडेकर, राजेंद्र माळोदे, निवृत्ती जामदार, गणेश घाटे, कचेश्वर गागरे, गणेश माळोदे, सचिन जामदार, विजय जामदार, संजय जामदार, विनायक देवकर, अविनाश पगारे, दिलीप रोकडे, वसंतराव चव्हाण, गंगाधर रोकडे, कैलास जामदार, श्रीरंग शिंदे, जनार्दन शिंदे, अरुण पाडेकर, अन्वरशेख, भारत चव्हाण, सुनील माळोदे, 

दिलीप जामदार, अण्णासाहेब जामदार, पंडितराव जानराव, राधाकृष्ण चन्ने, ज्ञानदेव कोतकर, प्रशांत पाडेकर, नानासाहेब जानराव, अशोक जामदार, नारायण जामदार, रवींद्र जामदार, शिवाजी वारकर, बाळासाहेब वारकर, जालिंदर वारकर, बाळासाहेब वारकर, संभाजीराव नवले, प्रदीप भवर, मनोज जगताप, बाबासाहेब नवले, गणेश वारकर, किशोर मोरे, विजय साबळे, अजित सिनगर, भाऊसाहेब भवर, शहाराम नाईकवाडे, सुरेश मारुती जाधव, मच्छिंद्र जामदार, अंबादास चव्हाण, गंगाधर कांबळे, सुरेश मुळे, दिलीप माळोदे, भाऊसाहेब देवकर, वाल्मीक सिनगर, सुधाकर वादे, 

अरुण साळुंके, गंगाधर रोकडे, अमोल शिंदे, किरण माळोदे, विशाल वैद्य, चांगदेव कोतकर, अरुण घाटे, विनायक देवकर, वैभव थोरात, जावेद शेख, किरण चव्हाण, साहेबराव माळोदे, अरुण पाडेकर, राजेंद्र जामदार, गोरक्षनाथ भवर, अरुण शिंदे, संजय भवर, आबासाहेब डुकरे, रघुनाथ टूपके, अशोक टूपके, जनार्दन भवर, तुकाराम टूपके,मौलाना मोहम्मदभाई शेख, तालिब सय्यद, नासिर सय्यद, अश्पाक शेख, कौसर शेख, जामिल शेख, आरिफ शेख, इलियाज पठाण, इम्रान सय्यद, रियाज सय्यद, नईमशेख, रसूल शेख, नौसद शेख, सादिक शेख आदी उपस्थित होते.