प्रत्येक वेळेस रस्त्यावर येण्याची गरज नाही, सामोपचाराने प्रश्न लागतात मार्गी  – मुख्याधिकारी राऊत

शेवगाव प्रतिनिधी, दि .१० : येथील शेवगावचा डेक्कन जीमखाना म्हणून ओळख असलेल्या खंडोबानगर परिसरातील उघड्या तुबलेल्या गटारी व सभोवताली वाढलेल्या काटेरी झुडपाकडे नगरपरिषदेचे दूर्लक्ष झाल्याने
या प्रभागामध्ये दुर्गंधी तसेच डेंगूचे पेशंट वाढले होते.

वंचित बहुजन आघाडीचे  युवक शहराध्यक्ष प्रितम गर्जे यांनी ही बाब भ्रमण ध्वनीद्वारे मुख्याधिकारी सचिन राऊत यांचे कानी घातली , शंभर टक्के घरपट्टी नळपट्टी वसूल करण्यात आली असताना खंडोबा नगर परिसरामध्ये मुद्दाम दुर्लक्ष होत असेल तर येथील सर्व कचरा नगरपरिषदेच्या कार्यालयात टाकावा काय अशी विचारणा केली असता.

     येथे काही दिवसापूर्वीच आलेले व अल्पावधीत कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केलेले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राऊत यांनी देखील या तक्रारीची तातडीने दखल घेवून संबधित विभागाच्या कर्मचा-यांना तेथे पाठवून काटेरी झुडपे तोडण्याची व तुंबलेल्या गटारी तातडीने स्वच्छ करण्याची मोहीम राबविली. परिसरातील नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गर्जे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राउत यांचे आभार मानले.

      त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-यांचा एक कॉल व प्रोब्लेम सॉल्व असा अनुभव परिसरातील नागरिकांना  आला. तसेच यातून प्रत्येक वेळेस रस्त्यावरच यावे असे नाही तर सामोपचाराने संपर्क साधून देखील प्रश्र मार्गी लागतात. हा संदेशही मुख्याधिकारी राऊत यानी कृतीतून दिला आहे.