कोपरगांव प्रतिनिधी, दि. २९ : संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने युजफुलबीआय या कंपनीने घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अतंर्गत मुलाखती घेवुन संजीवनीच्या तीन नवोदित अभियंत्यांची वार्षिक पॅकेज रू 5.5 लाख देवु करून त्यांना अंतिम निकाला अगोदरच नेमणुक पत्र दिले आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की व्यवसाय बुध्दिमत्ता, डेटा विज्ञान, डेटा अभियांत्रिकी, क्लाउड ट्रान्सफाॅर्मेशन, डेटा अंतर्ग्रहण , कृत्रिम बुध्दिमत्ता, डेटा गव्हर्नन्स, इत्यादी क्षेत्रात बेंगलोर येथे मुख्यालय असलेल्या युजफुलबीआय कंपनीने ऋतुजा दिलिप पठाडे, अरिहंत आनंद लोढा व गौरी रमेश बोरणारे यांची वार्षिक पॅकेज रू ५. ५ लाख देवु करून नोकरीसाठी निवड केली तसेच नेमणुकीचे पत्र ही दिले.
या महाकाय विश्वव्यापक स्पर्धेमध्ये अनेक सुशिक्षित तरूण-तरूणींवर मला नोकरी देता का? मला नोकरी देता का? अशी विनंती करण्याची वेळ येते. परंतु संजीवनीच्या विध्यार्थ्यांवर अशी वेळच येवु नये, यासाठी व्यवस्थापन काळजी घेत असते. संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे शाखा निहाय वेगवेगळ्या कंपन्यांना अपेक्षित असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव अभ्यासक्रम रचनेत केला जात असल्यामुळे कंपन्यांना जाॅब रेडी अभियंते मिळत आहे.
एका पाठोपाठ नवोदित अभियंत्यांची नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड होत असल्याने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले असुन निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. श्री अमित कोल्हे यांनी युजफुलबीआय मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. व्ही. एम. तिडके, विभाग प्रमुख डाॅ. डी. बी. क्षिरसागर उपस्थित होते.
‘ माझे वडील उच्च शिक्षित असल्याने त्यांना संजीवनीच्या गुणवत्तेची जाणिव होती. म्हणुन त्यांनी मला संजीवनीलाच डीप्लोमाला टाकले व नंतर डीग्रीसाठीही येथेच दाखल केले. माझ्या मुलाखतीच्या वेळेस कंपनीच्या प्रतिनिधिंनी मला पायथन व एसक्युएल या संगणकिय भाषांबद्धल सखोल प्रश्न विचारले. या संगणकिय भाषांचा शिकत असतानाच सखोल अभ्यास माझ्या शिक्षकांनी करून घेतला होता. तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने भाषेवरील प्रभुत्व, सर्व सामान्य ज्ञान, मुलाखतींचे तंत्र इत्यादी बाबींवर अनेकदा वर्ग घेतले. या सर्व अनुकुलतेमुळे माझी नोकरीसाठी सहज निवड झाली.’- गौरी बोरणारे.