५ नोव्हेंबर रोजी कर्मवीर शंकररावजी काळे यांचे १० वे पुण्यस्मरण कार्यक्रम                                                                                     

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : शिक्षण ,सहकार,सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा  ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १० व्या पुण्यस्मरण निमित्त पुष्पांजली कार्यक्रम शनिवार (दि.०५) रोजी सकाळी ९.०० वाजता तसेच या पुण्यस्मरण कार्यक्रमा निमित्ताने रविवार (दि.०६) रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार श्री संत तुकाराम महाराजांचे १० वे वंशज (पंढरपूर) ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर यांचा जाहीर हरी किर्तनाचा कार्यक्रम कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे होणार आहे. अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी दिली आहे.

             मागील दोन वर्ष वैश्विक कोरोना महामारी असल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी होती. त्यामुळे मागील दोन वर्ष पुण्यस्मरण कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आला होता. मात्र मागील काही महिन्यांपासून या महामारीचे मळभ चांगल्या प्रकारे दूर झाले झाले आहेत. त्यामुळे यावर्षी १० व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे.

 या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैताली काळे तसेच कारखान्याचे संचालक मंडळ, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य व विविध सलग्न संस्थांचे पादाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी स्व. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांवर व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, उद्योग समुह व काळे परिवारावर प्रेम करणा-या हितचिंतक, कोपरगाव मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांनी तसेच रयत परिवाराने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी केले आहे.