कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : नुकत्याच उन्हाळ्याच्यां सर्व शाळा व कॉलेजला सुट्ट्या लागल्या आहेत. परंतु वेळ कसा घालवायचा हा आता प्रश्न मुलांच्या आई-वडिलांना, आजी आजोबांना पडलाय. कोपरगावात मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमी मुले आहेत. त्यांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाही.
त्यामुळे मुले नाईलाजाणे टीव्ही व मोबाईल वापरतात. त्याचा दुष्परिणाम होतो. ज्या वयात मैदानी खेळ खेळले पाहिजे त्यासाठी कोपरगावात साधे मैदानही आजपर्यंत नगरपालिका उपलब्ध करून देऊ शकले नाही. त्याचबरोबर जे जेष्ठ नागरिक, महिला भगिनी आहेत त्यांना चालण्यासाठी सुरक्षित वॉकिंग ट्रॅक देखील नगरपालिका आज अखेर करू शकलेले नाही. ही मोठी शोकांतिका आहे.
मुलांमध्ये खेळाडूवृत्ती तयार होण्यासाठी /स्पोर्ट्समन स्पिरीट हे पुढच्या आयुष्यासाठी त्यांना उपयोगी पडतं. त्यांची शारीरिक वाढ चांगली होते, यासाठी कोपरगाव शहरांमध्ये महिला, पुरुष, खेळाडूंसाठी मोठे नवीन अद्यावत सर्व सोयींनी युक्त असे मोठे ग्राउंड केले पाहिजे.
त्याभोवती ज्येष्ठ नागरिकांना व नागरिकांना चालण्यासाठी स्वतंत्र ट्रॅक, तसेच ग्राउंडच्यां कडेला छोटे छोटे जिमचे साहित्य जेणेकरून मुलांना लहानपणापासूनच व्यायामाची आवड निर्माण होईल आणि ते त्यामुळें सुदृढ व निरोगी राहतील. तसेच त्या ग्राउंड मध्ये खो-खो खेळण्यासाठी, कबड्डी खेळण्यासाठी, त्याचबरोबर ग्राउंडच्या बाजूच्या जागेमध्ये तालीम सुद्धा केली पाहिजे. जेणेकरून सुदृढ मुलं पैलवान मुलं तयार होतील. ॲथलेटिक्स खेळणारी तयार होतील.
तसेच ग्राउंडच्या बाजूला बसण्यासाठी विरंगुळ्यासाठी स्वतंत्र बाकडे. या मूळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल मुलांचा वेळ जाईल व मुले सुदृढ खेळाडू वृत्तीचे तयार होतील व ग्राउंडच्या बाजूलाच छोटे छोटे हातगाडी वाले दुकानं यांनाही रोजगार मिळेल.
तरी कोपरगाव नगरपालिकेला विनंती आहे की, तात्काळ त्या दृष्टीने काम चालू करावे जेणेकरून अशा जागा उपलब्ध होतील व जनतेसाठी निदान पुढच्या पावसाळ्यानंतर मुलांना खेळायला व ज्येष्ठ नागरिकांसाठी जनतेसाठी कायमस्वरूपी ग्राउंड तयार होतील. असे मत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी व्यक्त केले आहे .