मराठाक्रांती स्वराज संघटनेच्या राहाता तालुकाध्यक्षपदी उत्तमराव धट

Mypage

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ : राहाता तालुका मराठाक्रांती स्वराज संघटनेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव धट यांची नुकतीच निवड करण्यांत आली त्याबददल त्यांचा जिल्हाध्यक्ष दिपकराव धट यांनी सत्कार केला.

Mypage

याप्रसंगी दापोली मतदार संघाचे आमदार संजय कदम, राष्ट्रीय सरचिटणीस व सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, बडोद्याचे राष्ट्रीय संस्थापक सदस्य व ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रदिप मोरे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा. संध्याताई राणे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड आनंदराव भोसले, ठाणे जिल्हा ग्रामिणचे अध्यक्ष गुरूनाथ यशवंतराव, सौ श्रध्दा धट, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ वैशाली गलगटे, राज्य उपाध्यक्ष अनिल बुवा जाधव, राज्य सरचिटणीस संजयराव जाधव, खेडच्या प्रांताधिकारी सौ राजश्री मोरे, जिल्हा उपाध्यक्ष बापूराव सूराळकर कोपरगांव तालुका मराठा क्रांती स्वराज संघटनेचे सचिव सोमनाथ राशिनकर, तालुका संघटक रवींद्र ठोंबरे यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. 

Mypage

           जिल्हाध्यक्ष दीपकराव धट याप्रसंगी बोलताना म्हणाले की, मराठा समाजाच्या अडीअडचणी या संघटनेच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचवून त्या सोडवण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे.  या निवडीनंतर सत्कारास उत्तर देतांना श्री. उत्तमराव धट म्हणाले की, जिल्हाध्यक्ष दिपकराव धट यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यात मराठा समाजाच्या वंचित प्रश्नांना न्याय मिळवून देवून समाजाच्या उन्नतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *