कोपरगांव प्रतिनिधी, दि. २६ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीतुन नवोदित अभियंत्यांना त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच नोकऱ्या मिळत असुन अलिकडेच मॅन्डेलबल्ब टेक्नॉलाजिज व इपिटोम प्रा. लि. कंपन्यांनी सहा नवोदित अभियंत्यांना कॅॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखती घेवुन नोकरीचे नेमणुक पत्र दिले आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अधिकृत सुत्रांनी दिली.
मॅन्डेलबल्ब टेक्नालॉजिज या आर्टिफिशिल इंटिलिजन्स, क्लाउड मायग्रेशन, क्लाउड सिक्युरिटी, आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने शुभम दत्तात्रय कोते याची नोकरीसाठी निवड केली आहे. इपिटोम प्रा. लि. या पीसीबी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने पृथ्वीराज किशोर पवार, यशोदा दिलिप चिने, ऋतिका बाळासाहेब मुसमाडे, प्रेरणा रविंद्र रावुत व महेश पप्पु घुगे यांची नोकऱ्यांसाठी निवड केली आहे.
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज हे ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे कंपन्यांना अभिप्रेत असलेला आधुनिक तंत्रज्ञान समावेशक अभ्यासक्रमाची रचना करण्याची स्वायत्ता असल्याने कंपन्याना त्यांना पाहीजे तसे अभियंते संजीवनी मधुन मिळत आहे. एकापाठोपाठ एक कंपनी येथिल अभियंत्यांची निवड करीत आहे. यामुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे प्लेसमेंटच्या बाबतीत ग्रामिण महाराष्ट्रात उच्चांक प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
पालकांनी ज्या विश्वासाने त्यांच्या पाल्यांना संजीवनी मध्ये दाखल केले, तो विश्वास संजीवनी सार्थ ठरवत आहे. त्यामुळे अनेक पालक संजीवनी प्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी विध्यार्थ्यांच्या धडाकेबाज निवडींबध्दल समाधान व्यक्त केले असुन त्यांनी निवड झालेले नवोदित अभियंते, त्यांचे भाग्यवान पालक तसेच डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. व्ही. एम. तिडके व त्यांची टीम आणि विभाग प्रमुखांचे अभिनंदन केले आहे.