रस्त्यावर नादुरुस्त झालेल्या लालपरिची कोळपेवाडीच्या तरूणाकडुन दुरुस्ती

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : कोपरगाव मार्गावर शुक्रवारी सांयकाळी साडे सहा वाजता नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आगाराची एम एच २० बि एल ३३०७ क्रमांकांची नाशिक – कुंभारी बस कोळपेवाडी येथील गणेश चौकात ट्रफिकमध्ये बंद पडली. गाडी पुढे जाईना, ना मागे हलेना ‘ सांयकाळची वेळ असल्याने चालक वाहका पुढे मोठे संकट उभे राहिले.

हि बाब सामाजिक कार्यकर्ते रमेश भोंगळ यांना समजता त्यांनी सहकारी राधाकृष्ण कोळपे व दत्तात्रय शिंदे यांना बरोबर घेवून चालक दिनकर नागरे यांना विचारले असता त्यांनी गियर लिव्हर मिनींग मधुन बाहेर आल्याने गियर पडत नसल्याचे सांगुन कोपरगाव आगाराच्या दुरुस्ती वर्कशॉप शी संपर्क साधला आहे. परंतु गणेश फिटर येण्यासाठी दहा वाजतील असा निरोप मिळाला असल्याचे सांगितले.

राधाकृष्ण कोळपे यांनी आपल्या वाहन व्यवसायाचे कौशल्य पनाला लावत गाडी खाली घुसून गियर बाँक्स शाँप्ट मधून निखळुन पडलेला लिव्हर मिंनिग मध्ये बसवत पान्हाच्या साह्याने नट घट्ट पणे आवळून बसची कोळपेवाडी पोलीस आउट पोस्ट पर्यंत गियर व्यवस्थित पडतात कि नाही याची चाचणी घेतली तेव्हा शँप्ट चे मिंनिग खराब झाल्याचे आढळले बस भोंगळ यांच्या वर्कशॉप मध्ये नेवून शाँप्ट लिव्हरला वेल्डिंग करण्यात आला.

गीयर पडण्यास कुठलीही अडचण नसल्याचे समाधान नागरे यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पणे जानवत तुम्ही आमच्यासाठी देवदुत बनून आला असे नागरे यांनी सांगितले. वाहक उमेश दराडे यांनी चहा पाण्यासाठी देत असलेली रक्कम भोंगळ व सहकार्यानी नाकारत हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगितल्याने चालक व वाहक यांनी जगामध्ये अद्यापही माणुसकी जिंवत असल्याचे सांगत बस पुढील मार्गावर रवाना केली.