प्राचार्या मंजुषा सुरवसे भारत भूषण सन्मान पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : नेहरू युवा केंद्र पणजी गोवा व स्वायत्तशासी संस्था, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरातील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिराच्या प्राचार्या मंजुषाताई सुरवसे यांच्या विविध सामाजिक शैक्षणिक कार्याची दखल घेऊन भारत भूषण सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, गोवा राज्याचे मजूर व पुराभिलेख मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, खासदार विजय तेंडुलकर, गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विद्धीज्ञ दयानंद नार्वेकर, नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ, संजय म्हापसेकर, प्रा. डॉ. बी. एन. खरात आदिसह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी गोवा राज्याचे मजूर व पुराभिलेख मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले कीआजचे पुरस्कर्ते यांच्या कार्य हे तरुणांना देखील लाजविणारी आहे. यातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी यांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच शैक्षणिक क्षेत्रात असून देखील मुख्याध्यापिका मंजुषा सुरवसे यांनी शिक्षणासह व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य हे समाजाला दिशादर्शक ठरणारे आहे. असे सांगून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

तर सन्मानाला उत्तर देतानामुख्याध्यापिका सुरवसे म्हणाल्या की, मला पुरस्कार वितरित केल्याबद्दल आभार मानले, सदरचा पुरस्कार हा माझ्या एकटीचा नसून माझ्या शाळेतील विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद व शाळेच्या सर्व कमिटी सदस्य, व पालक बंधू भगिनी यांचा आहे व तो मी कर्मवीर अण्णांच्या चरणी समर्पित करते. या पुरस्कार सोहळ्यास विविध मान्यवरांसह सिद्धेश्वर सुरवसे, रामचंद्र         शिखरे, गौरव शिखरे, मृणाल सुरवसे, सौ. माधुरी शिखरे, पत्रकार युसूफ रंगरेज आर्या शिखरे आदिसह मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.