कडू यांच्या निधनाने काम बंद करून वकिलांनी केले शोक व्यक्त
कोपरगाव प्रतिनिधी, दि.९ : कोपरगाव येथील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड बाळासाहेब भाऊसाहेब कडू यांचे शुक्रवारी ७ जुलै २०२३ रोजी मध्यराञी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जेष्ठ विधीज्ञ बाळासाहेब कडू यांच्या अकस्मात निधनाची माहिती समजतात कोपरगाव तालुका वकिल संघाच्यावतीने न्यायालयीन कामकाज एक दिवसासाठी बंद ठेवून स्व. कडू यांना श्रद्धांजली वाहिली.
ॲड. बाळासाहेब कडू हे मागील ४० वर्षापासून कोपरगाव येथे वकीली व्यवसायात होते. अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणात त्यांनी विधिज्ञ म्हणून काम पाहिले. कोपरगाव शहरातील व अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत विधीज्ञ म्हणून त्यांचा लौकिक होता. या काळात त्यांनी कोपरगाव वकील संघाचे अध्यक्षपद , तसेच कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक तसेच राजकीय पदे भूषविले. त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले होते.
त्यांच्या पाश्चात्य छञपती संभाजीनगर उच्च न्यायालयातील विधिज्ञ ॲड. शिवराज कडू पाटील तसेच कोपरगाव येथील विधीज्ञ ॲड. मनोज कडू ही दोन मुलं, पश्चात पत्नी, मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. स्व. कडू यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.