भारतीय सैन्यदलातील हवालदार दिपक आहेर यांचेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Mypage

 कोपरगाव प्रतिनिधी दि.१० : भारतीय सैन्यदलातील २५३ मेडिअम रेजिमेंटचे हवालदार व तालुक्याचे सुपुत्र दिपक कृष्णा आहेर (वय – ४१)  यांचे ९ जुलै २०२३ रोजी सकाळी ४:१५ मी. लष्करी कमांड हाॅस्पिटल, पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले.

Mypage

  त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी वैकुंठ भुमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोळपेवाडी व सुरेगाव ग्रामस्थ दुकाने बंद ठेवून अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झाले. महाराष्ट्र पोलीस दल व भारतीय लष्कराच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून बिगुल वाजवत हवालदार दिपक आहेर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.

Mypage

यावेळी “मेजर दिपक आहेर अमर रहे”,अमर रहे “भारत माता की जय” च्या घोषणाना देतांना उपस्थित जनसमुदायाच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. रविवारी सकाळी दिपक आहेर यांच्या निधनाची बातमी कळताच आहेर कुटुंबा बरोबर कोळपेवाडी ग्रांमस्थाना शोक अनावर झाला सन २००० साली सैन्य दलात दाखल होवून २३ वर्षे देश सेवा बजावत निवृत्तीस काही दिवस शिल्लक असतांना आजारी पडलेले दिपक आहेर वयाच्या ४१ व्या वर्षी कमांड हाॅस्पिटल, पुणे येथे उपचारा दरम्यान निधन झाले.

Mypage

पुणे येथून कोळपेवाडी शिवेवर पार्थिव दाखल झाल्या नंतर माजी सैनिक दलाच्या वतीने खांदा देवुन दिपक आहेर यांचे पार्थिव लष्कराच्या फूलांनी सजवलेल्या ट्रक मध्ये ठेवण्यात आले ट्रक पुढे ऐ मेरे वतन कें लोगो…”हे गीत लाऊडस्पीकरवर वाजत होते रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी  दिपक आहेर  यांना मानवंदना देत अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. बाजार तळावर उभारलेल्या मंडपात दिपक आहेर यांचे पार्थिव नागरिकांना अंत्य दर्शनासाठी ठेवले होते.

Mypage

भारतीय सैन्यदलाच्या वतीने नायब सुभेदार शामसुंदर जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोपरगांवचे तहसिलदार संदिपकुमार भोसले,माजी आमदार अशोकराव काळे,जिल्हा माजी सैनिक कल्याण बोर्डा च्या वतीने सुभेदार धन्यकुमार सरवदे,सुभेदार यमाजी चेहडे,कोपरगांव तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे, कोपरगांव तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष युवराज गांगवे, सुभेदार मारुती कोपरे, संदिप कोळपकर, स्वच्छतादूत सुशांत घोडके, संरपच सुर्यभान कोळपे , शंशिकांत वाबळे, निवृत्ती कोळपे आदिनी पुष्पचक्र अर्पण केले यावेळी अनेक मान्य वरांनी श्रध्दाजंली अर्पन केली.

Mypage

हवालदार दिपक आहेर यांच्या पार्थिवावर ठेवण्यात आलेला राष्ट्रध्वज पत्नी कांचन यांचेकडे सुपुर्द करण्यात आला. त्यांचा मुलगा साहिल याने हवालदार दिपक यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडीचे सुपुत्र मेजर दीपक कृष्णा आहेर देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना देशाच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! अशा शब्दात जिल्हा सहकारी बॅंकेत संचालक व कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी शोक व्यक्त केला.  दरम्यान शहीद जवान दिपक आहेर यांच्या निधनाबद्दल माजी आमदार अशोकराव काळे यांनी शोक व्यक्त करुन आहेर यांना श्रद्धांजली वाहिली. 

Mypage