कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७: कोपरगाव येथील एका हिंदू युवतीवर अत्याचार करुन तीला धर्मांतर करण्याची जबरदस्ती केल्याच्या प्रकरणामुळे सकल हिंदु समाजाच्यावती कोपरगाव येथे २० जुलै रोजी जन आक्रोश मोर्चा निघणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस दक्ष झाले असुन संपूर्ण पोलीस यंञणेचे या मोर्चावर लक्ष केंद्रीत केल्याने दोन दिवस अगोदर पासुनच जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोपरगावमध्ये तळ ठोकला आहे. तसेच दिवस राञ करडी नजर ठेवून पोलीस शहरात व तालुक्यात गस्त घालत आहेत.
हिंदू मुस्लिम वाद होणार नाही किंवा या मोर्चातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त ठेवण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. २० जुलै रोजी जरी जन आक्रोश मोर्चा असला तरी पोलीस विभागाने आजपासुन तयारी केली आहे. १९ जूलै रोजीच कोपरगाव शहराला पोलीस छावणीचे स्वरुप येणार आहे.
शेकडो पोलीसांच्या तुकड्या कोपरगाव शहरात दाखल होणार असल्याने येत्या काळात कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावणाऱ्याची गय केली जाणार नसावी अशी व्यवस्था जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरु केल्याने तालुक्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीसांच्या तुकड्या दिसणार असल्याने कोपरगावच्या मोर्चाकडे संपूर्ण पोलीस यंत्रणा व शासकीय यंञणा बारीक लक्ष ठेवून आहे.