शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून त्यात येथील पद्म भूषण बाळासाहेब भारदे विद्यालयाच्या विद्यार्थीनीने तालुका गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे.
इयत्ता पाचवीचे दोन विद्यार्थी व इयत्ता आठवीच्या एका विद्यार्थिनीची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली. श्रेया बाळासाहेब घावटे हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. अनुराग आसाराम कपिले व वेदांत अमरसिंग प्रजापती यांची इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली.इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना निलेश मोरे, बाळासाहेब घावटे, रविंद्र पवार तर इयत्ता आठवीसाठी सतीश जगदाळे, राहुल भोसले, विशाल जागीरदार, दिलीप पालमकर यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे शाळा समिती अध्यक्ष हरीश भारदे प्राचार्य शिवदास सरोदे उपप्राचार्य संजय कुलकर्णी आदिनी अभिनंदन केले आहे.