शेवगावात महिलेने घेतला गळफास, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा नातेवाईकांचा आरोप

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : शेवगावातील एका तीशीच्या महिलेने रविवारी सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून या संदर्भात मृत महिलेच्या एका नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादीतील गार्भार्य लक्षात घेऊन या प्रकरणी परिक्षाविधिन आयपीएस पोलीस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.

        याबाबत  संबंधित  महिलेच्या एका नातेवाईकाने शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करुन सदर महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. फिर्यादीत अनिता काळे व प्रशांत घुटे या दोघांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         या घटनेनंतर पोलीस यंत्रणेने कमालीची गुप्तता पाळत तपास सुरु केल्याने, या घटनेचे आणखी गूढ वाढले असून यात आणखी आरोपीं असण्याची शक्यता वर्तविली जात असून तशी शेवगावात चर्चा आहे.