पोलिसांसह सर्व शासकीय यंञणा ऍक्शन मोडवर
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : कोपरगाव येथील एका युवतीवर वारंवार अत्याचार करून तिला धर्मांतर करण्यास भाग पाडल्या प्रकरणी सकल हिंदूंच्यावतीने आज गुरूवारी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन या मोर्चामध्ये सकल हिंदू बांधवांचा हिंदू जनजागृतीसाठी व पीडितेला न्याय मिळावा तसेच लव्ह जिहाद वृत्तीच्या विरोधात आपला आक्रोश व्यक्त करण्यात येणार आहे. तालुक्यासह राज्यभरातील हजारो नागरिक सहभागी होणार असल्याने गुरूवारी संपूर्ण कोपरगाव भगवे वादळ निर्माण होणार आहे.
कोपरगावच्या सकल हिंदू समाजाच्यावतीने पञकार परिषद घेवून आक्रोश मोर्चाची रूपरेषा सांगण्यात आली तसेच मोर्चामध्ये किती लोकांचा सहभाग असु शकतो. येणाऱ्या मोर्चेकऱ्यांची कशी व्यवस्था केली. या संदर्भात कोरकमिटीचे सदस्य संतोष गंगवाल यांनी माहिती दिली. ते म्हणाले लव्ह जिहाद या प्रकरणावरुन सर्वसामान्य जनतेच्या मनात चिड निर्माण झाली असुन केवळ कोपरगावच्या युवतीवर अत्याचार झाली नाही तर संपूर्ण देशभरात अशा घटना वारंवार होत असल्याने हा आक्रोश कोपरगाव मध्ये व्यक्त केला जातोय. त्यासाठी अंदाजे २० हजारांच्या पुढे जनसागर उसळणार आहे.
येणाऱ्या मोर्चेकऱ्यांची योग्य व्यवस्था केली आहे. संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. शहराच्या चारी दिशांना गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चाचे मुख्य मार्गदर्शक सुरेश चव्हाण असणार आहेत तर त्यांच्या सोबत असलेल्या हर्षदा ठाकुर, श्रध्दा शिंदे, सागर बेग हे मोर्चेकऱ्यांना संबोधित करतील. उपस्थित साधु संतांच्या हस्ते भगव्या ध्वजाचं पुजन करुन मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चा अतिशय शिस्तबद्ध असणार असुन ११ युवतींच्या हस्ते मोर्चाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे. यावेळी वरील चार मान्यवरांशिवाय कोणीही भाषण करणार नसल्याची माहिती समिती सदस्य संतोष गंगावाल यांनी दिली.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले, कोपरगावच्या युवतीवर झालेला हा प्रकार आपल्या घराच्या दारात येवून पोहोचला आहे. आपण शांत बसलो तर ही विकृती आपल्या मुली बाळींना घरातून घेवून जातील. असे कृत्य करणाऱ्यांना आता मुस्लीम धर्मातील कायद्या प्रमाणे देहदंडाची शिक्षा दिली पाहिजे. कोपरगावच्या मुस्लिमांनी कधीच चुकीचं काम केले नाही. पण बाहेरून आलेल्या काही मुस्लिमांनी के कृत्य केले आहे. त्याला पाठीशी घालणाऱ्यांचासुध्दा बेत बघीतला जाईल असेही वहाडणे म्हणाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे म्हणाले मुस्लीम समाजाच्या मौलवीकडून मुस्लिम मुलांना बिघडले जाते. त्यांची माथी भडकावून चुकीच्या दिशेने भरकटवलं जातय. चुकीचं काम करणाऱ्या मदरशा वर योगी सरकार प्बुरमाणे लडोझर फिरवला पाहिजे. असे म्हणत आजचा हा मोर्चा केवळ मुस्लिम विरोधी नसुन
हा मोर्चा हिंदुंना जागृत करणारा आहे असेही ते म्हणाले. यावेळी सुनिल गंगुले, दत्ता काले, अनिल गायकवाड, प्रफुल्ल शिंगाडे, सनी वाघ, यांनी आपले विचार व्यक्त करून मोर्चा संदर्भात माहिती दिली. यावेळी प्रमोद लबडे, राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, कैलास जाधव, बाळासाहेब जाधव,चेतन खुबानी,संतोष चवंडके, विनायक गायकवाड, सुनील फंड,कलविंदर दडियाल, बबलु वाणी, योगेश बागुल यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान कोपरगाव पोलिसांनी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असुन चारशे पोलीसांचा फौजफाटा सुरक्षेसाठी दाखल करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून ४ पोलीस उपअधीक्षक, १४ पोलीस निरीक्षक, आर.सी.पी. च्या विशेष दोन तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे तसेच मोर्चाच्या दरम्यान कोणतीही गडबड होवू नये म्हणुन शहहरात विविध ठिकाणी तब्बल ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याने पोलीसांसह कॅमेऱ्यांची सर्वञ नजर असणार आहे.
शहरातील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. इतर पर्यायी मार्गाची व्यवस्था पोलीस प्रशासनाने केली आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली. पालीका प्रशासनाच्यावतीने अग्निशमन दलाची यंञणा सतर्क ठेवून मोर्चेकऱ्यांच्या मार्गात मोकाट जनावरे शिरणार नाही याची विषेश खबरदारी घेतली आहे. आरोग्य विभागाने आपली वैद्यकीय यंञणा दक्ष ठेवली आहे.
या मोर्चामध्ये सर्वाधिक युवती व महिलांचा सहभाग लक्षणीय असल्याने महिला स्वच्छतागृहांची मागणी माजी नगरसेविका सपना मोरे यांनी पालिकेकडे केल्याने तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे.अतिक्रमण करुन शहरातील मुख्य रस्त्यावर दुकाने थाटलेल्या दुकानदारांची दुकाने काढून टाकण्यात आल्याने शहरातील मुख्य रस्ता सध्यातरी सुटसुटीत झाला आहे. या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.