कोल्हे साखर कारखान्याचे उस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील उस उत्पादक सभासद शेतक-यांचे प्रति एकरी उत्पादन वाढविण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उस तज्ञ अरुण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठिबक सिंचनाच्या महत्वासह मार्गदर्शक मेळाव्याचे ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी आयोजन केले, असुन सभासद शेतक-यांनी यास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्ष रमेश घोडेराव, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले आहे. 

कारखान्याच्या उस विकास विभागातील सर्व शेतकी कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण ३१ जुलै रोजी दुपारी २ वाजता कारखाना कार्यस्थळावर प्रशिक्षण व १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता देर्डे को-हाळे, कुंभारी, वेळापूर व वाकद गटातील उस उत्पादक सभासद शेतक-यांसाठी मार्गदर्शन जय मातादी लॉन्स देर्डे येथे, तर दुपारी २ वाजता दहेगांव, करंजी, जेउरकुंभारी, ब्राम्हणगांव, वारी व येवला गट विभागातील उस उत्पादक सभासद शेतक-यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ शिंगणापुर येथे उपस्थित राहुन उस तज्ञ अरूण देशमुख यांच्या मौलिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे, आवाहन कारखान्याच्या शेतकी विभागाने केले आहे.

उसाचे घटते उत्पादन त्यादृष्टीने करावयाच्या विशेष उपाययोजना त्याचबरोबर शेतक-यांना प्रति एकरी कमी पाण्यात कमी खर्चात अधिकचे उस उत्पादन कसे मिळेल यासाठी कोईमतूर, व्हीएसआय, पाडेगांवसह, कारखाना नर्सरीत विकसीत केलेल्या नवनविन उस जातींची माहिती सभासद शेतक-यांना व्हावी, उस लागवड तंत्रज्ञानात झालेल्या त्रुटींची दुरूस्ती, दिवसेंदिवस पाण्यांची कमी होणारी उपलब्धता यावर ठिबक सिंचन कसे उपयुक्त आहे यासाठी कारखान्याचे युवा अभ्यासु नेतृत्व अध्यक्ष विवेक कोल्हे सातत्याने प्रयत्न करत आहेत.