शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम पब्लिक स्कूलच्या कार्यालयात सपंन्न झाली. मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर शंकरराव काळे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. अध्यक्ष पदाची सूचना मच्छिंद्र रोहमारे यांनी मांडली सदर सूचनेस अशोक मुरलीधर काळे यांनी अनुमोदन दिले.

मच्छिंद्र रोहमारे यांनी दिवंगत झालेले सभासद, मान्यवर, हितचिंतक, कर्मचारी यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला. विषय पत्रिकेप्रमाणे सभेच्या कामकाजास सुरूवात होवून विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त आ. आशुतोष काळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना संस्थेचा शैक्षणिक उद्देश मांडत संलग्न शाखांकडुन नफा न कमवता उत्तम प्रकारे ज्ञानदानाचे कार्य करणे हा संस्थेचे संस्थापक स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न या संस्थेमार्फत अखंडपणे चालु ठेवला असल्याचे सांगितले.

शासनाच्या येत्या काळात बदलत्या शैक्षणिक धोरणाचा विचार करता आपल्या शैक्षणिक संस्थेतही बदल करणे आवश्यक असुन त्यानुसार विविध कोर्सेस, ज्युनियर कॉलेज मार्फत अथवा फ्रचाईसी नियुक्त करून चालु करण्याचा प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.

संस्थेचे हेडक्लर्क केशव दळवी यांनी अहवाल वाचन केले तर संस्थेचे सभासद कारभारी आगवण यांनी उपस्थितांचे आभार मानले. संस्थेच्या सचिव चैताली काळे, कारभारी आगवण, सिकंदर पटेल, भास्करराव आवारे, बाबासाहेब कोते, उत्तम औताडे, राधुजी कोळपे, दिलीप चांदगुडे, रामराव गवळी, चांगदेव आगवण, अशोक मुरलीधर काळे, 

मच्छिंद्र रोहमारे, मच्छिंद्र देशमुख, मधुकर घुमरे, राहुल मांजरे तसेच गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख, सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यायाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिटयुटचे प्राचार्य सुभाष भारती, न्यू इंग्लिश स्कूल देर्डे चांदवडचे मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, काकडीचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे उपस्थित होते.