रोटरी क्लबचे कार्य जगात आदर्शवत – हेरकळ

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १९ : ‘रोटरी क्लब हा जगभरात २०० देशांमध्ये ३६००० क्लबच्या माध्यमातुन सामाजिक, शैक्षणिक व आरेग्याच्या संदर्भात कार्य करीत आहे. रोटरी क्लब मार्फत जगभरात केलेल्या पोलिओ निर्मुलनाचे कार्य उल्लेखनिय आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातुन युथ एक्सचेंज उपक्रमाअंतर्गत आपल्या विध्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठीच्या संधी आहेत.

रोटरी सदस्याच्या घरीच त्या कुटूंबाचा सदस्य म्हणुन विध्यार्थी राहतो. तसेच परदेशातील विध्यार्थीही आपल्याकडे येवुन राहु शकतात. अशा प्रकारे रोटरी क्लबचे कार्य जगात आदर्शवत आहे’, असे प्रतिपादन ९ जिल्ह्याातील ८४ क्लबच्या (रोटरी डिस्ट्रिक्ट क्रमांक ३१३२) प्रांतपाल रोटरीयन स्वाती हेरकळ यांनी केले.

संजीवनी काॅलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्चच्या भव्य सभागृहामध्ये रोटरी क्लब ऑफ  कोपरगांव सेंट्रलच्या वतीने रोटरी क्लब असेंब्ली आयोजीत करण्यात आली होती. या कार्यक्रमात श्रीमती हेरकळ बोलत होत्या. सदर प्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रमोद शिंदे  (सातारा), दि रोटरी फाऊंडेशन डायरेक्टर सीए नितिन कुदळे (अकलुज), क्लबचे अध्यक्ष राकेश  काले, रोटरी क्लबचे मार्गदर्शक  अमित कोल्हे, क्लबचे सर्विस प्रोजेक्ट डायरेक्टर सुमित कोल्हे, माजी अध्यक्ष रोहित वाघ व विरेश  अग्रवाल, सचिव विशाल  आढाव, खजिनदार अमर नरोडे, प्रकाश  जाधव, कुणाल आभाळे, राजन शेंडगे , सनी अव्हाड, इम्रान सय्यद, नवनाथ सोमासे, विशाल  मुंदडा, अनुप डागा, कपिल पवार, हर्षल  दोशी , महेंद्र गवळी,आदी उपस्थित  होते.

क्लब असेंब्लीच्या अगोदर रोटरी ब्लबच्या पुढाकारने आयुर्वेदा हाॅस्पिटल मध्ये एकलव्य आदिवासी आश्रमशाळेच्या विध्यार्थ्यांसाठी आयोजीत केलेल्या नेत्ररोग तपासणी शिबिराचे उद्घाटन श्रीमती हेरकळ यांच्या हस्ते करण्यात आले. यात ४०० विद्यार्थ्यांची  नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच असेंब्लीचा कार्यक्रम झाल्यावर रोटरीच्या वतीने २०० वृक्षांची लागवड करून १००० झाडांच्या वृक्षारोपन मोहिमेची सुरूवात करण्यात आली.

प्रारंभी राकेश काले यांनी सर्वांचे स्वागत करून रोटरी क्लबने वर्षभरात  गरजु महिलांना शिलाई मशीनचे वाटप, अपंगांना स्वयंचलित तीन चाकी सायकलींचे वाटप, जिल्हा परीषद शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपन, दंत चिकित्सा शिबीर  इत्यादी उपक्रम पुर्ण केल्याचे सांगीतले. तसेच रोटरीयन हेरकळ यांच्या बध्दल बोलताना काले म्हणाले की हेरकळ यांनी रोटरीच्या माध्यमातुन अनेक ठिकाणी पिण्याच्या पाणी समस्या, महिलांना  शेळी पालन व्यवसाय, आधुनिक शेती औजारे बॅन्क, असे उपक्रम राबविल्याचे सांगीतले.

रोटरीयन हेरकळ यांनी रोटरी क्लब ऑफ  कोपरगांव सेंट्रलच्या कार्याचे कौतुक केले. तसेच या क्लब मार्फत प्रस्तावित केलेल्या कॅन्सर निदान सेंटरला आंतरराष्ट्रीय  स्तरावरून भरघोस मदत देण्याचे जाहिर केले. हा क्लब कोपरगांव शहर व परीसराचा मानबिंदु ठरेल असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला. महेंद्र गवळी यांनी सुत्रसंचालन केले तर सुमित कोल्हे यांनी आपल्या खुमासदार शैली मध्ये आभार मानले.