कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : जगभरातील सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून जनसामान्यांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी, त्यांना आर्थिक बळ मिळावे आणि सहकारातील पतसंस्था चळवळ अधिक बळकट व्हावी. तसेच जगभरातील सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेली असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन अधिक बळकट करण्याचा ठराव संमत करण्यात आला असल्याचे असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यू) आयोजित नेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेल्या जागतिक सहकारी पतसंस्थांच्या मेळाव्यात ॲक्यूचे संचालक व खजिनदार, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करीत असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.
तसेच या आशियाई सहकारी पतसंस्थांच्या मेळाव्यात काका कोयटे यांनी समता पतसंस्थेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व ग्राहकांना दिली जाणारी तत्पर सेवा या विषयाचे चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण केले, असता उपस्थित सर्व देशांनी समता पतसंस्थेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहक तत्पर सेवेचा गुणगौरव होत असून संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांचेही अभिनंदन करण्यात आले.
समताचे तंत्रज्ञान व ग्राहक सेवा जगातील पतसंस्थांना ही दिशादर्शक असल्यामुळे संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी जगभरातील सहकारी पतसंस्थांना मार्गदर्शन करावे, असे वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ क्रेडिट युनियन (WOCCU) च्या अध्यक्षा एलिना लॅब्रॉड यांनी मनोगतातून व्यक्त करताच उपस्थित प्रतिनिधींनी टाळ्यांच्या गजरात यास अनुमोदन दिले.
तसेच फेडरेशनच्या संचालिका ॲड.डॉ.अंजलीताई पाटील यांनी देखील महाराष्ट्रात राज्य फेडरेशन संचलित सहकार उद्यमीच्या माध्यमातून करीत असलेल्या कामाचे चित्रफितीद्वारा सादरीकरण केले. काठमांडू येथील सोलटी या पंचतारांकित हॉटेलमध्ये आशियाई सहकारी पतसंस्थांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जगभरातील २६ देशांचे ४६३ प्रतिनिधी उपस्थित होते.
ॲक्युचे अध्यक्ष व कोरियन फेडरेशनचे अध्यक्ष यौनसिक किम हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. त्याचबरोबर ॲक्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलेनिता व्ही.सॅनड्रॉक, रणजीत हेत्तीयाराची यांनी मार्गदर्शन केले. ॲक्यूचे उपाध्यक्ष थायलंडचे विरा वाँगसन, फिलिपाईन्सचे निकोलस एम.वातेंटीन या देशांच्या पदाधिकाऱ्यांसह नेपाळ येथील लाबोर्डे प्रेसिडेंट आणि वर्ल्ड कौन्सिल ऑफ को – ऑफ क्रेडिट युनियनचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलिस्सा मक्कार्टर, नेपाळचे लोकसभेचे सभापती आर एच होंदेव, राज जिमिरे हे देखील उपस्थित होते. नेपाळ फेडरेशनचे अध्यक्ष परितोष पौड्याल व केबी उप्रेती, पदाधिकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल भारताच्या उपस्थित प्रतिनिधी ॲड.डॉ.अंजलीताई पाटील यांनी आभार मानले.