कोपरगाव प्रतिनिधी, दि. २: कोपरगाव शहरात सायंकाळी सातच्या दरम्यान मुसळधार पावसासह विजांचा गडगडाट सुरु झाल्याने कोपरगाव शहरातील नागरिकांच्या छातीतील ठोके चुकत होते.
दिवसभर शहरात लाईट गुल झाली. लाईटच्या प्रतिक्षेत नागरीक होते पण सायंकाळी सातच्या दरम्यान अचानक जोरदार पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागल्या, जोराचा जसा पाऊस सुरु झाला. परंतू सोबतच विजाचा खडकात इतका मोठा होता की अनेकांच्या छातीचे ठोके चुकत होते.
डोळ्यासमोर विजा चमकत होत्या अचानक मोठ्याने आवाज होत होता. नागरिकांनी घराचे दरवाजे, खिडक्या बंद करुन घाबरुन घरात बसले. अवघ्या काही क्षणात आकाशातून धर्तीवर क्षेपणास्त्र फेकत असल्याचा भास होत होता.अर्ध्या तासांमध्ये कोपरगावकरांची चिंता वाढली होती.