शासकीय जागेत व्यवसायिक बांधकाम केल्याने शर्तभंग झाली – विवेक कोल्हे

 महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टने शर्तभंग केली, आम्ही नाही 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव शहरातील एका ट्रस्टने शासकीय जागेत व्यवसायिक बांधकाम करुन न्यायालयाचा अवमान व शासनाच्या अटीशर्तींचा भंग केला आहे. माञ आमच्या संस्थेने केला नाही असे मत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले. 

 कोपरगाव शहरातील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने व शेतकरी विकास संघ यांच्या नावाने शासकीय जमीन ताब्यात घेवून तालुक्यातील आजी माजी आमदारांनी अतिक्रमण केल्याचे प्रसिध्दी माध्यमातून प्रसिद्ध झाले. तसेच बीआरएसचे नेते सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी संबंधीत शासकीय जागेवर नेत्यांनी अतिक्रमण केले असुन ते त्वरित काढण्यासाठी चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसल्याने तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला.

या संदर्भात पञकारांनी विवेक कोल्हे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, हे खरं आहे की, पुर्वी शासन विविध प्रकल्प राबवण्यासाठी शासकीय जाग देत होती. ती आमच्याही संस्थेला दिली विषेशत: महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट व आमच्या संस्थेला एकाच वेळी ती जागा दिल्याने तिथे आमचेही नाव जोडले गेले, माञ आमच्या संस्थेला ज्या हेतूंसाठी जागा दिली त्यासाठीच आजही काम चालु आहे.

माञ समोरच्या संस्थेने न्यायालय व शासनाच्या अटी शर्तीचे भंग केले आहे. ज्या हेतूंसाठी जागा दिली होती त्या हेतूने वापर न करता तिथे व्यवसायिक बांधकाम केले आहे. ती जमीन देताना आम्हाला एकञ दिल्यामुळे आमचं नाव तिथे जोडलं जातंय.  पण आम्ही न्यायालयाकडे व शासनाकडे योग्य ती कागदपत्रे जोडली आहेत. सध्या न्यायप्रविष्ट बाब असल्याने आम्हाला योग्य तो न्याय मिळेल. संबंधीत ट्रस्टने न्यायालयाचा आदेश डावलला आहे.

न्यायालयाने स्थगिती दिलेली असतानाही तिथे व्यवसायिक बांधकाम म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे. परंतु या संदर्भात मी अधिक बोलणार नाही  ही न्यायप्रविष्ट बाब आहे, असे म्हणत आपली बाजूनं मांडली.  परंतु येत्या काळात कोपरगावच्या शासकीय जागेच्या वाद वाढणार की, मिटणार याकडे लक्ष लागले आहे.