शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे रविवारी मतदान

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.३ : शेवगाव तालुक्यात पार पडणाऱ्या २७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.५) होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे, परिक्षाविधीन तहसीलदार राहूल गुरव यांनी दिली. यावेळी २७ ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी ७८ उमेदवार निवडणूक लढवित असून एकूण ९४ प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यांच्या २४३ जागांसाठी ५७३ उमेदवार उभे आहेत. एकूण मतदाराची संख्या ५६ हजार ३६१ असून त्यात २९ हजार ७३२ पुरुष तसेच २६ हजार ६२९ महिला मतदारांचा समावेश आहे.

Mypage

मतदानासाठी १०७ मतदान केंद्र करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई अशा पाच कर्मचारी व काही राखीव अशा एकूण ७२५ अधिकारी, कर्मचार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतदान साहित्य व कर्मचारी नेण्या आणण्यासाठी १३ खासगी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

Mypage

याशिवाय रावतळे कुरुडगाव ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी एक मतदान केंद्र असून तेथे २४२ पुरुष व २३१ महिला असे ४७३ मतदार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक गावात पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तहसीलदार प्रशांत सांगडे सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. 

Mypage