शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : शेवगाव पंचायत समितीच्या पशुधन विभागाचे प्रयत्न तसेच पशुपालकाच्या सजगतेने सध्या तालुक्यात जनावराचा लम्पी चर्मरोग बर्यापैको आटोक्यात आल्याने आता तालुक्यातील शेवगाव व बोधेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरणारे जनावराचे आठवडे बाजार गुरुवार पासून सुरु करण्यात आले. शेवगावला जनावरांचा आठवडे बाजार रविवार ( दि. ५) रोजी भरणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ यांनी दिली.
सन २०२३-२४ मध्ये आज आखेर तालुक्यातील शंभर गावातील १४२५ जनावरे लम्पी रोग बाधित झाली होती. यापैकी १३०५ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. सध्या ७४ जनावरावर उपचार सुरू आहेत. आज अखेर ४६ जनावरे मयत झाली असून तीव्र आजारी असलेल्या जनावरांची संख्या फक्त ३ असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. ऋषिकेश खेतमाळीस यांनी दिली.
पशुधनावरील लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यंतरी जनावरांच्या बाजारावर नियंत्रण आणण्यात आले होते. मात्र, सध्या या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिलेल्या आदेशान्वये तालुक्यातील बोधेगाव व शेवगावचे जनावरांचे आठवडे बाजार पुन्हा सुरु करण्यात येत आहेत.
लम्पी साथीच्या दुसऱ्या टप्यात शेवगाव तालुक्यात बाधित पशुधनाच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. या टप्यात आखेर सन २०२३ – २४ मध्ये बाधित जनावरांची संख्या ८०३ वर पोहचली असून त्यापैकी ५९६ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. सध्या १७८ जनावरावर उपचार सुरु आहेत. मयत जनावरांची संख्या २९ असून आठ जनावरे तीव्र आजारी असल्याची माहिती प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. ऋषिकेश खेतमाळीस यांनी दिली.
या अगोदर लम्पी चर्मरोगाच्या पहिल्या टप्यात तालुक्यात सुमारे अडीच हजार पशुधन बाधित झाले होते. दुसऱ्या टप्यात बाधिताची संख्या वाढल्याने पशुपालकात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट जनावरामधून लम्पीचा प्रादर्भाव वाढत असल्याने पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागासह नगरपरिषद व तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील गावा-गावात मोकाट जनावराचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागाकडून शेतकऱ्यानी आपल्या जनावराच्या गोठ्याची स्वच्छता ठेवावी, किटक नाशक औषध फवारणी व धुराळणी करावी, बाधित जनावरांचे विलगीकरण करून त्यांची वेगळी व्यवस्था करुन त्या बाबतची माहिती त्वरित पशुधन विकास विभागास देण्यात यावी. अशा स्वरुपाचे प्रबोधन पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागाकडून जोरात सुरु असून खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील रविवार तसेच बोधेगाव उप बाजार समिती मध्ये गुरुवारी भरणारा आठवडे जनावरांचे बाजार बंद करण्यात आले असल्याची माहिती ही पशुधन विकास अधिकारी डॉ. खेतमाळीस यांनी यावेळी दिली.
तालुक्यात लम्पी चर्मरोग नियंत्रण व रोगमुक्त महाराष्ट्र या ७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत ‘माझा गोठा स्वच्छ गोठा ‘ हा उपक्रम सध्या शेवगाव तालुका पशुसंवर्धन विभाग युध्द पातळीवर राबवित आहे. पशुसंवर्धन विभागाने या मोहिमेची माहिती देण्यासाठी परिसरातील पशुपालकांचे प्रशिक्षण घेऊन प्रबोधन केले आहे. त्यास परिसरातील पशुपालकiनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
गावपातळीवरील प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सहभाग घेण्यात आला असून गावांतील दोन स्वयंसेवक, एक’पशु वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांच्या समक्ष भेटी घेत असून त्यांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपायोजना व ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ उपक्रमाची सविस्तर माहिती देत आहेत. यावेळी गोठा व परिसराची स्वच्छता करवून घेरुन फॉगींग मशीनद्वारे फवारणी करुन घेण्यात येत आहे. झालेल्या कामाचा आढावा नियंत्रण अधिकारी तथा पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहूल कदम तसेच तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चारुदत्त असलकर समक्ष प्रत्यक्ष पहाणी करुन घेत आहेत.
तालुक्यातील ७० हजार १४० जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तरीही अन्य काही ठिकाणी लम्पीचा प्रादुर्भाव आधिक असल्याने सर्वच पशुपालक काळजीत आहेत. तालुक्यात आज अखेर १३०१ जनावरे बाधित आढळली असून त्यापैकी ८८४ औषधोपचारानंतर बरी झाली आहेत ३७६ जनावरावर सध्या उपचार सुरू आहेत. तर ४१ जनावरे दगावली आहेत.