महात्मा गांधी जयंती निमित् स्वच्छतेसाठी एक तास तथा स्वच्छता हीच सेवा अभियानात सक्रीय सहभाग

शेवगाव प्रतिनिधी, दि. 03 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित् रविवारी ( दि .१ ) केंद्र व राज्य शासन आयोजित स्वच्छतेसाठी एक तास तथा स्वच्छता हीच सेवा या अभिनव उपक्रमात शेवगाव नगर परिषदेसह तहसिल, पंचायत समिती, सार्वजानिक बांधकाम विभाग, तसेच शहर व तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील विविध शैक्षणिका संस्थातील अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात सक्रीय सहभाग घेतला.

शहरातील विविध ठिकाणी सकाळी १० पासून मोहिमेची सुरवात झाली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत, स्वच्छता निरीक्षक भरत चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या १२० स्वच्छता कर्मचा-यांची १२ पथके करून शहरातील पैठणरस्त्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा परिसर, क्रान्ती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहीद भगतसिंग चौक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, संत गाडगे महाराज चौक या परिसरात श्रमदान मोहिम राबविण्यात आली. त्यात नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचार्‍यासह  त्या त्या परिसरातील नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.

प्रवरा शैक्षणिक समुहाच्या आर्टस कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या परिसरात पार पडलेल्या श्रमदान मोहिमेत प्राचार्य डॉ. ओंकार रसाळ, उपप्राचार्य मोहन परतवाघ, एन.एस.एस प्रमुख रोहित खरात, वाचनालयाचे सचिव हरिष भारदे, ग्रंथपाल साजिद शेख यांचेसह ५० स्वयंसेवक विद्यार्थी ‘ विद्यार्थिनीनी सहभाग घेतला.

पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामुदायिक श्रमदन अभियाना बरोबरच स्वच्छता संदेश व घोष वाक्या द्वारे जनजागृती केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिष भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे, संजय कुलकर्णी, उमेश घेवरीकर, सदाशिव काटेकर आदिची उपस्थिती होती.