शेवगाव प्रतिनिधी, दि. ०३ : करिअरची निवड करत असताना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे तसेच सांघिक चर्चेमधून आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करावा असे वाहन उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी येथे केले. येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात ” परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आणि करिअर कट्टा ” उद्घाटन श्री मते यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे, तहसिलदार प्रशांत सांगडे, राज्य माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, डॉ. युवराज सुडके, प्रा. अडसरे, कॅप्टन भाऊसाहेब शिंदे, डॉ. अशोक चोथे, विकास इंगळे, राजेश्वरी सरोदे उपस्थित होते. यावेळी तहसिलदार सांगडे यांनी वेळेचे नियोजन करून अभ्यासासाठी उपयुक्त असणाऱ्या योग्य साधनाची निवड करावी असा सल्ला दिला.
महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष शितोळे यांनी करियर कट्टाच्या अंतर्गत जवळपास २५० वेगवेगळे कोर्स असून आयएएस व आयपीएस अधिकारी या उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असल्याची माहिती दिली.
यावेळी एनसीसीचे कॅप्टन शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उपस्थितांना शपथ दिली. तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजना करीता आणि मतदान नोंदणी, जनजागृती करीता महाविद्यालय व तहसिल कार्यालय, यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. गहिनीनाथ शेळके यांनी प्रास्ताविका केले. प्रा. राहुल ताके यांनी सुत्रसंचलन केले. तर डॉ. नितीन भिसे यांनी आभार मानले.
ReplyReply allForward |