कोपरगाव शहरात बसविणार ४५ सी.सी.टी.व्ही.कॅमेरे – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : २०२३-२४ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात आमदार काळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मतदार संघाच्या अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नाबरोबर कोपरगाव शहरातील गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी कोपरगाव शहरात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवावे अशी मागणी केली होती. त्या मागणीची गृहविभागाने गांभीर्याने दखल घेवून हि मागणी मान्य केली असून कोपरगाव शहरात ४५ सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविले जाणार आहे अशी माहिती आमदार काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर पोलीस स्टेशनची अनेक पदे रिक्त असल्यामुळे पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेल्या कोपरगाव शहराची कायदा, सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस प्रशासनाला मदत होवून कोपरगाव शहरातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संपूर्ण कोपरगाव शहरातील चौका-चौकात व गर्दीच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविणे गरजेचे होते. मागील काही वर्षात कोपरगाव शहरात गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण, घर फोडीच्या घटना व दुचाकी, चारचाकी पळविण्याच्या अनेक घटना घडल्यामुळे नागरिकांच्या चिंता वाढल्या होत्या.

नागरिकांच्या वाढलेल्या चिंता दूर करण्यासाठी व वाढलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण आटोक्यात येवून कोपरगाव शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकडे आ. काळे यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचे लक्ष वेधून कोपरगाव शहरात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. त्याबाबत त्यांच्या सुरु असलेल्या पाठपुराव्याची गृहविभागाने दखल घेतली असून कोपरगाव शहरात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे आ. काळे यांनी सांगितले आहे.

याठिकाणी बसविणार ४५ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे- के.जे.सोमय्या महाविद्यालय (३), न्यायालय रोड (१), महात्मा गांधी चौक (०२), छत्रपती शिवाजी महाराज चौक (०३), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक (०३), लोकशाहीर आण्णा भाऊ साठे चौक (०२), श्री साईबाबा कॉर्नर (०२), येवला नाका(०३), बाबा चौक, निवारा कॉर्नर (०२), टाकळी नाका (०३), बैल बाजार रोड (०२), छत्रपती संभाजी महाराज रोड (०४), तहसील चौक (०२), शनी मंदिर (धर्मवीर चौक) (०३), १०५ हनुमान नगर (०२), सराफ बाजार प्रवेशद्वार (०२), सराफ बाजार बाहेरचा मार्ग (०२), पोलीस स्टेशन (०२), एस.जी.विद्यालय चौक (आचारी हॉस्पिटल चौक) (०२) या ठिकाणी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यात येणार आहे.

त्यामुळे निश्चितपणे वाढती गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाबरोबरच शहर विकासाचे मुलभूत प्रश्न मार्गी लावणाऱ्या आ. काळे यांनी कोपरगाव शहराची कायदा सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी कोपरगाव शहरात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्याची मागणी गृहविभागाकडून मंजूर करून घेतल्यामुळे कोपरगावकरांनी आ. काळे यांचे आभार मानले आहे.