बोरुडे महाराज श्री रेणुका माता चरणी

शेवगाव प्रतिनिधी, दि.१४ : तालुक्यातील भावी निमगावच्या श्री जगदंबेचे उपासक, रामायणाचार्य ह.भ.प. अशोक महाराज बोरुडे यांनी गणेशवाडीचे अशोक महाराज निरफळ, अंमळनेरचे ज्ञानेश्वर महाराज मिसाळ यांचे समवेत श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानात येऊन आई साहेबांचे व देवस्थानात माहूर गडाहून नुकत्याच आगमन झालेल्या पायी ज्योतीचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी रेणुका भक्तानुरागी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत नाना भालेराव यांचे हस्ते या संत महंताचा रेणुका देवस्थानाच्या वतीने सत्कार करण्यात आला. दामु आण्णा काकडे, बाळासाहेब चौधरी, डॉ. अरविंद पोटफोडे, पार्थर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, माजी नगराध्यक्षा जनाबाई घोडके, चंद्रकांत गायकवाड, प्रा. जनार्दन लांडे उपस्थित होते.  

लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या व देशासह विदेशात देखील लौकिक पोहचलेल्या श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानची उभारणी डॉ. प्रशांत नानाच्या अपार श्रद्धा व परिश्रमातून झाली आहे. असे सांगून त्यांची श्रध्दा कधीही निष्फळ ठरणार नाही. आई साहेबांची त्यांचेवर सदैव कृपा दृष्टी राहील. असे आशिर्वाद महंत बोरुडे महाराजांनी नानांना  दिले.